Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार, अभिनेत्याच्या बहिणीने केले मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 18:03 IST

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी दोन गटात विभागली गेली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी दोन गटात विभागली गेली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूबद्दल जोरदार वाद सुरु आहे. फॅन्ससोबतच अनेक कलाकारांनी सुशांतच्या प्रकरणात सीबीआय तपासाची मागणी केली होती. बिहार सरकारची मागणी मान्य करत आता यापुढील या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे.  या बातमीनंतर सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स खूश झाले आहेत.तसेच त्याच्या बहिणीलाही विश्वास आहे की  आपल्या भावाला न्याय मिळेल. सुशांतच्या बहिणीने ट्विरवर लिहिले की, 'CBI it is!#JusticeForSushant #CBIEnquiryForSSR #CBIenquiry'.

सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे येत्या दिवसांत रियाच्या अडचणींमध्ये भर पडणार, हे निश्चित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. . रिया चक्रवर्तीला कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण पाटण्यातून मुंबईला हस्तांतरित व्हावे, अशी याचिकाकर्तीची इच्छा आहे. मात्र याचिकाकर्ती रियाविरोधात गंभीर आरोप आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत