Join us

​कॅटचे असेही ‘सोंग’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 16:38 IST

दीपिका पादुकोण सध्या बॉलिवूडची ‘हायेस्ट पेड’ अर्थात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्र्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ या दोघींना ...

दीपिका पादुकोण सध्या बॉलिवूडची ‘हायेस्ट पेड’ अर्थात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्र्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ या दोघींना पछाडून दीपिकाने हा पल्ला गाठला. खरे तर बॉलिवूडमध्ये सर्वत्र हीच चर्चा आहे. पण कॅटरिनाला मात्र याची खबरही नाही. अर्थात हे आम्ही नाही, तर खुद्द कॅटनेच बोलून दाखवले आहे. होय, दीपिका बॉलिवूडची सध्याची ‘हायेस्ट पेड’ अभिनेत्री आहे, तुला याबद्दल काय वाटते? असा प्रश्न कॅटला अलीकडे विचारण्यात आला. मात्र कॅटने काहीच माहित नसल्याच्या थाटात, ‘ओह, रिअली? मला हे अजिबात ठाऊक नव्हते’, असे उत्तर दिले. आता आपल्या अवतीभवती काय सुरु आहे, हे कॅटला माहित नसणे, म्हणजे जरा अतीच झाले. पण काय करणार, बॉलिवूडमध्ये असे ‘सोंग’ घेणारे पदोपदी भेटतात...