Join us

​कॅटची चिडचिड, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 15:28 IST

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना आता सिंगल आहे आणि ही स्पेस ती मस्तपैकी एन्जॉयही करतेय. पण याचदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ...

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना आता सिंगल आहे आणि ही स्पेस ती मस्तपैकी एन्जॉयही करतेय. पण याचदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा व आदित्य राय कपूरसोबतच तिच्या लिंकअपच्या बातम्याही चर्चेत आहे. पण खरे सांगायचे तर, या बातम्यांनी कॅट जाम वैतागली आहे. तिच्याबद्दल लिहिल्या जाणाºया या बातम्या तिला नकोशा झाल्या आहेत. होय, कॅटरिनाच्या एका जवळच्या मित्राने ही माहिती दिलीय. कॅटरिनाचे नाव कधी सिद्धार्थ व तर आदित्यशी जोडले जातेय. या लिंकअपच्या बातम्यांनी कॅट चांगलीच चिडलीयं. कॅट कुणासोबतही दिसो, लगेच तिचे नाव त्या व्यक्तिशी जोडले जाते. हे चुकीचे असल्याचे कॅटचे मत आहे. याशिवाय तिच्या वैतागामागे आणखी एक कारण आहे.  रणबीर कुण्या मुलीशी दिसला तरी लोकांना त्याने काही फरक पडत नाही. त्याचे नाव त्या मुलीशी जोडले जात नाही, मग माझेच का?असाही कॅटचा सवाल आहे. आता इतकं वाचल्यानंतर कॅटच नेमकं दुखणं तुम्हाला कळलं असेलच!!