Join us

Catfights : दीपिका पादुकोनशी तुलना केल्याने प्रियंका चोपडाची आई संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 19:55 IST

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहेत. त्यामुळे साहजिकच दोघींमध्ये सातत्याने तुलना केली ...

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहेत. त्यामुळे साहजिकच दोघींमध्ये सातत्याने तुलना केली जात आहे. परंतु अशाप्रकारची तुलना करणे प्रियंकाची आई मधु चोपडा यांना अजिबातच आवडत नसल्याचे दिसून आले. जेव्हा त्यांना या दोघींविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी माध्यमांनाच विचारले की, तुम्हीच सांगा दोघींची तुलना होऊ शकते काय? त्या उपरही प्रियंकाची कोणासोबतच तुलना होऊ शकत नसून, ती जे काही काम करते ते खूपच स्पेशल असल्याचे त्यांनी म्हटले. ३४ वर्षीय प्रियंकाने २०१५ मध्ये अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’मधून करिअरला सुरुवात केली होती. तिचा पहिला हॉलिवूडपट ‘बेवॉच’ लवकरच रिलिज होणार असून, यामध्ये ती निगेटिव्ह भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. तर दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ यावर्षाच्या जानेवारी महिन्यात रिलिज झाला होता. सध्या दोघीही आंतरराष्टÑीय स्तरावर झळकत असून, हॉलिवूडशी संबंधित आणखी काही आॅफर्स त्यांच्याकडे चालून येत आहेत. प्रियंका आणि दीपिकाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमात दोघीचीही ट्यूनिंग जबरदस्त होती. त्याचबरोबर आंतरराष्टÑीय स्तरावर काम करीत असतानाही दोघी खूपच एकमेकींविषयी सकारात्मक असल्याचे बघावयास मिळते; मात्र आता प्रियंकाच्या आईने माझ्या मुलीची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असे म्हटल्यामुळे दोघींच्या नात्यात दरार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे बघितले तर बॉलिवूडमधील बरेचसे स्टार्स हॉलिवूडच्या वाटेवर आहेत. हुमा कुरेशी आरणि निमरत कौर सध्या आंतरराष्टÑीय प्रोजेक्ट्समध्ये काम करीत आहे. हुमा गुरिंदर चढ्ढाचा सिनेमा ‘द वायसराय हाउस’मध्ये बघावयास मिळणार असून, निमरत अमेरिकी टीव्ही कार्यक्रम ‘होमलॅण्ड’मध्ये झळकणार आहे.