Join us

कॅटचा ‘इलियान’ला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:46 IST

अ भिनेत्री इलियाना डी क्रुज चा बॉलिवुडचा प्रवास म्हणावा तितका सुखकर नक्कीच नाही. तिला मिळालेल्या 'बर्फी' चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे ...

अ भिनेत्री इलियाना डी क्रुज चा बॉलिवुडचा प्रवास म्हणावा तितका सुखकर नक्कीच नाही. तिला मिळालेल्या 'बर्फी' चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे ती रसिकांच्या लक्षात राहिली. यानंतर या नाजूक अभिनेत्रीने 'मै तेरा हिरो', 'हॅप्पी ऐंडिंग' यांसारख्या चित्रपटांतही काम केले. परंतु या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. आता इलियानाला ज्ॉकी चॅनच्या 'कुंग फु योगा'या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात इलियाना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. यात तिच्या अभिनयाला वाव मिळणार असून लहान सहान स्टंट करायलाही मिळणार आहेत. सोनू सुदचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटातील इलियानाचा रोल आधी कॅटरिना कैफला ऑफर झाला होता परंतु तारखांच्या अभावी तिने तो सोडल्याचे समजते.