Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅटरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 13:24 IST

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफची ‘स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे. कॅटरिनाला हिंदी चित्रपटातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान ...

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफची ‘स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे. कॅटरिनाला हिंदी चित्रपटातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कॅटरिनाला हा अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर ट्विटर तिची मजा उडविणे सुरु झाले आहे. या अवॉर्डची सुरुवात ही 1984 पासून झाली आहे. तन्वी आजमी, विद्या बालन, श्रीदेवी, मनीषा कोईराला, करीना कपूर, ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोन, प्रियांका चोपडा व तब्बू या अभिनेत्रींना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. परंतु,  कॅटरिनाची या पुरस्कारामुळे ट्विटरवर मजाक उडविली जात आहे.