Join us

​कंगनामुळे कॅटला लॉटरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 17:58 IST

अलीकडे एक बातमी वाचून शाहरूख खान आणि कंगना राणौतचे चाहते चांगलेच सुखावले होते. ‘तनु वेड्स मनु’ फेम दिग्दर्शक आनंद ...

अलीकडे एक बातमी वाचून शाहरूख खान आणि कंगना राणौतचे चाहते चांगलेच सुखावले होते. ‘तनु वेड्स मनु’ फेम दिग्दर्शक आनंद एल राय  यांच्या नव्या चित्रपटात शाहरूख व कंगना एकत्र दिसणार, अशी ही बातमी होती. पण कदाचित या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. होय, कारण कंगनाच्या हातून हा चित्रपट निसटल्याची बातमी आहे. आनंद एल राय आपल्या नव्या चित्रपटात शाहरूखच्या अपोझिट कंगनाला घेऊ इच्छित होते. पण ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’च्या शूटींगवेळी कंगनाच्या मनमानीने आनंद एल राय जाम वैतागले होते. हा अनुभव बघता, आनंद यांनी आपल्या नव्या चित्रपटासाठी कंगनाऐवजी दुसºया अभिनेत्रीच्या नावावर विचार चालवला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून कॅटरिना कैफ आहे. कॅटरिना येत्या काही दिवसांत हा चित्रपट साईन करणार असल्याची बातमी आहे. असे झाल्यास शाहरूखसोबतचा कॅटचा हा दुसरा चित्रपट असेल. खरे तर, या चित्रपटात एक नाही तर दोन अभिनेत्री असणार, अशीही चर्चा आहे. अर्थात एक कॅटरिना तर दुसरी कोण ? हे अद्याप ठाऊक नाही. पुढे मागे या दुसºया हिरोईनचे नावही आपल्याला कळेल. पण तोपर्यंत तरी कंगनामुळे कॅटला लॉटरी लागली, असे म्हणायला  हरकत नाही.