कॅट होती फर्स्ट चॉईस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 12:14 IST
दोनच दिवसांपूर्वी कळाले होते की, तरून मनसुखानी यांच्या आगामी चित्रपटात सुशांतसिंग राजपूत सोबत श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे. ...
कॅट होती फर्स्ट चॉईस?
दोनच दिवसांपूर्वी कळाले होते की, तरून मनसुखानी यांच्या आगामी चित्रपटात सुशांतसिंग राजपूत सोबत श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटासाठी तरूनची फर्स्ट चॉईस कॅटरिना कैफ होती.धर्मा प्रोडक्शन्स आणि सलमान खान फिल्म्स यांचा आगामी अॅक्शन चित्रपट भलताच चर्चेत आहे. कॅटरिना कैफला मग का काढण्यात आले असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल! तर हो. कॅटरिना या चित्रपटातील भूमिकेसाठी परफेक्ट होती.पण तिने दुसरा एक चित्रपट साईन केलेला असल्याने तिला या चित्रपटावर पाणी सोडावे लागले. कारण दोन्ही चित्रपटांच्या तारखा एकच येत होत्या. नंतर जॅकलीनकडे चित्रपटाची टीम वळली. आणि शेवटी जॅकलीनच या चित्रपटासाठी फाईनल झाली.