Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कॅटच्या चाहत्यांना लागली लॉटरी..फेसबुक पेज अन् लाईव्ह चॅट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 22:14 IST

‘बॉलिवूडची बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ हिचा आज(१६ जुलै) वाढदिवस. आज वाढदिवसाच्या दिवशी कॅटरिनाने तिच्या चाहत्यांना एक आगळी-वेगळी भेट दिली. ही भेट म्हणजे आजपासून कॅटरिना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली.

‘बॉलिवूडची बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ हिचा आज(१६ जुलै) वाढदिवस. आज  वाढदिवसाच्या दिवशी कॅटरिनाने तिच्या चाहत्यांना एक आगळी-वेगळी भेट दिली. ही भेट म्हणजे आजपासून कॅटरिना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली. सोशल मीडियाबद्दलची सगळी भीती, गैरसमज दूर सारून कॅट सोशल मीडियावर आली. आश्चर्य वाटेल, पण अगदी काही तासांतच कॅटरिनाच्या फेसबुक पेजला 30 लाख चाहत्यांनी भेट दिली. याचदरम्यान कॅटने तिच्या चाहत्यांना आणखी मोठा धक्का दिला. तो म्हणजे, लाईव्ह चॅटचा..व्वा, चाहत्यांची तर लॉटरीच लागली. लाईव्ह चॅटींग दरम्यान कॅटरिना काहीशी गोंधळली तर बरीच उत्सूकही दिली. पहिल्यांदा ती लाईव्ह आली. पण काय करावे, हेच तिला कळेला ती काहीशी गोंधळली.. लाईव्ह चॅटींगदरम्यान कॅटरिनाचा फोनची बीपिंग ऐकू येऊ लागली. कॅटरिनाने यासाठी दिलगीरीही व्यक्त केली. आज माझा वाढदिवस असल्याने फोन जास्त वाजतोय, असे सांगत चाहत्यांशी बोलतांना अडचण नको म्हणून तिने तिचा फोनच सायलेन्ट केला. रात्रभर पार्टी झाल्याने मी डोळ्यांत काहीसी झोप आहे, हे सांगताना ती माफी मागायलाही विसरली नाही. कॅटरिनाच्या एक एक अदा चाहत्यांना अक्षरश: वेड लावूल गेल्या. मग काय??? लाईव्ह चॅटदरम्यानचा कॅटचा अंदाज पाहून चाहते तिच्या पुन्हा प्रेमात पडले नसतील तर नवल!