कॅट व रणबीरची लपाछपी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2016 13:12 IST
दिवाळी हा सण सर्वांना एकत्र आणतो, असे म्हणतात. असे असेल तर निश्चितपणे कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर या दोघांच्या ...
कॅट व रणबीरची लपाछपी!!
दिवाळी हा सण सर्वांना एकत्र आणतो, असे म्हणतात. असे असेल तर निश्चितपणे कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर या दोघांच्या बाबतही हे खरे व्हायला हवे. पण नियतीला कदाचित हे मान्य नाही. आता कॅट व रणबीर दोघेही एकत्र येणे नाही. काल शुक्रवारी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी दिलेल्या दिवाळी पार्टीत तरी हेच दिसून आले. कॅटरिना व रणबीर या पार्टीत कसे एन्ट्री घेतात,याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच दोघांनाही वेगवेगळी एन्ट्री घेतली. गतवर्षी अशाच दिवाळी पार्टीत हे दोघेही हातात हात घालून आले होते. कालच्या पार्टीत मात्र दोघेही परस्परांना टाळताना दिसले. होय, दोघांमध्येही जणू लपाछपीचा खेळ सुरु होता. कॅट एकीकडे कबीर खान याच्यासोबत बिझी होती तर रणबीर पूर्णवेळ आदित्य राय कपूर आणि अर्जून कपूर यांच्यासोबत मौजमस्ती करताना दिसला. अर्जून आणि आदित्य हे कॅटचेही चांगले मित्र आहेत, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. आदित्य तर कॅटचा रणबीर तिच्या आयुष्यात येण्याआधीपासूनचा मित्र आहेत. मध्यंतरी आदित्य व कॅट एकमेकांना डेट करीत असल्याच्या वावड्या उठल्या. पण कदाचित असे नाहीच. कारण तसे असते तर रणबीर आदित्यसोबत इतक्या खुल्लमखुल्ला मस्ती करताना दिसला नसता. शेवटी कॅटला कितीही टाळले तरी रणबीरच्या मनात तिच्याबद्दल काही भावना तर असणारच ना?