Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तची पत्नी मान्यताच्या फोटोवरील कॅप्शनने वेधून घेतले सगळ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:38 IST

संजय दत्त त्याची पत्नी मान्यता दत्त तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त त्याची पत्नी मान्यता दत्त तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये मान्यताने समजवायचा प्रयत्न केला आहे की कधी कधी भावना समजावू शकत नाही. या पोस्टसोबत मान्यताने एक सुंदर फोटोदेखील शेअर केले आहेत.

मान्यता दत्तने लिहिले की, कधी कधी तुम्हाला गप्प बसावे लागते कारण कोणताच शब्द हे समजावू शकत नाही की तुमच्या डोक्यात आणि मनात काय चालू आहे.

संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरशी झुंज देतो आहे. या आजाराचा त्यावेळी खुलासा झाला जेव्हा कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संजूबाबाचा कॅन्सर चौथ्या स्टेजला आहे. संजय दत्तला पुढीच्या उपचारांसाठी अमेरिकेला जायचे होता पण आता या प्लॅनमध्ये बदल केला जाईल.

 न्यूजच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तने आपला निर्णय बदलला आहे आता तो मुंबईमध्येच उपचार घेणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे अमेरिकेला जायचे की नाही या पेचामध्ये तो आहे. तर दुसरीकडे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते आहे आणि त्याचे प्रमाण वाढते आहे.

रिपोर्टनुसार गेल्या दोन आठवड्यापासून लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी संजय दत्तच्या फुफ्फुसांमधून 1.5 लीटर इतके पाणी काढले आहे. डॉ. जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली संजय दत्तवर उपचार होत आहेत, त्यांनी ही हेच सांगितले की संजय दत्त अमेरिकाला जायचे टाळले आहे.मान्यता दत्तने इन्स्टाग्रामवर दोनही मुलांचे फोटो शेअर केले आहे. यात संजय दत्तची दोनही मुलं हसताना दिसतायेत. या फोटो शेअर करताना मान्यता दत्तने लिहिले की, वेळ बदलते आहे. देव तुमच्या शांततेचे रक्षण करो.. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल. #love #grace #positivity #dutts #ganpatibappamorya #beautifullife #thankyougod.' असे हॅशटॅग तिने वापरले आहेत. त्रिशालाने मान्यता दत्तच्या फोटोवर कमेंट करताना हात जोडले आहे.

टॅग्स :संजय दत्तकर्करोग