Cannes 2018: ती आली,तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं, ‘बॉलीवुडच्या क्वीन’चा कान्समध्ये बोलबोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 13:30 IST
कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात नेहमीच चर्चा होत असते. साऱ्या जगाच्या नजरा असणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ...
Cannes 2018: ती आली,तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं, ‘बॉलीवुडच्या क्वीन’चा कान्समध्ये बोलबोला
कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात नेहमीच चर्चा होत असते. साऱ्या जगाच्या नजरा असणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. दरवर्षी विविध देशांचे सिनेमा आणि जगभरातील कलाकारांचा मेळा कान्समध्ये भरतो. सिनेमांसोबतच दरवर्षी इथं येणाऱ्या आणि आपल्या स्टाइलचा जलवा दाखवणाऱ्या कलाकारांविषयी जगभरातील रसिकांना उत्सुकता असते. सर्वात जास्त चर्चा रंगते ती कान्सच्या रेड कार्पेटची. कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. तशीच उत्सुकता यंदाच्या कान्स सोहळ्यासाठी आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीलाच ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं काहीसं घडलं. ही ती म्हणजे बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत. पहिल्यांदाच कान्समध्ये हजेरी लावणाऱ्या कंगणाने आपल्या स्टाइल स्टेटमेंटने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. कान्सच्या रेड कार्पेटवर बॉलीवुडची क्वीन भारतीय साडी परिधान केलेल्या अंदाजात अवतरली. ऐश्वर्या राय बच्चनच्या पावलावर पाऊल ठेवत कंगणाने कान्सच्या रेड कार्पेट पदार्पणासाठी साडी नेसणं पसंत केलं. कंगणाने यावेळी सगळ्यात महागडी साडी नेसली होती. तिच्या काळ्या रंगाच्या साडीवर हँड कट महागडे खडे जरदोजी तंत्र वापरून विणले होते. भारतातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड ‘सब्यासाची’च्या ‘अक्षतारा’ कलेक्शनमधली ही साडी साऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरली. याशिवाय मोती आणि पाचूचा नेकलेसही सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता. हॉलिवुड सिनेमातील अभिनेत्रींसारखी कंगणाची हेअरस्टाईही कान्समध्ये चर्चेचा विषय ठरली. तिचा हा अंदाज क्वीनला शोभावा असाच होता. बॉलीवुडची ट्रेंडसेटर अभिनेत्री म्हणून कंगणा ओळखली जाते. तिच्या हटके फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. त्यामुळे कान्सच्या रेड कार्पेटवरील पदार्पणातल्या स्टाईल आणि फॅशनने साऱ्यांनाच प्रभावित केल्याचे पाहायला मिळाले.