Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cannes 2018 : कान्समधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर; बघून व्हाल दंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 22:33 IST

कान्समधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या अपीयरेंसची पूर्ण तयारी करून आहे. या अगोदर मेट गाला २०१८ मध्येही दीपिका पादुकोणचा लूक जबरदस्त चर्चेत होता. बºयाच लोकांनी याचे कौतुक केले तर काहींनी चक्क त्यावर सडकून टीकाही केली. आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून दीपिका पादुकोणचे काही लेटेस्ट फोटो समोर येत आहेत. दीपिकाचे हे फोटो बघून तुम्ही तिच्या सौंदर्याचे कौतुक करणार यात शंका नाही. दीपिकाने स्वत:च तिच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. या दोन्ही फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या लूकमध्ये बघावयास मिळत आहे. एका फोटोमध्ये दीपिका पांढºया रंगाच्या कॅज्युएल टी शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसत आहे. यावर तिने स्टीलेटो परिधान केला असून, डोक्याचे केस मोकळे सोडले आहेत. दीपिकाचा हा कॅज्युअल लूक बघून तुम्ही तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.  या व्यतिरिक्त तिने चाहत्यांसाठी आणखी एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. दीपिका पादुकोण पहिल्यांदा २०१० मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अपीयर झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी दीपिका पादुकोण सर्वांनाच इम्प्रेस करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. गेल्यावर्षीदेखील तिने आपल्या लूकने सर्वांनाच इम्प्रेस केले होते.  दीपिका पादुकोण १० आणि ११ मे रोजी कान्सच्या कारपेटवर आपला जलवा दाखविणार आहे. मेट गाला आफ्टर पार्टीमधील लूकमुळे दीपिकाचे चाहते चांगलेच निराश झाले होते. परंतु आता दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमधील तिचा लूक बघून चाहत्यांमध्ये नक्कीच उत्साहाचे वातावरण असेल. दीपिका कॅज्युअल आणि कंम्फर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.