Cannes 2018 : कान्समधील ऐश्वर्याचा पहिला लूक आला समोर; पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 22:19 IST
माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला पोहोचली असून, कान्समधील तिचा पहिला लूक समोर आला आहे.
Cannes 2018 : कान्समधील ऐश्वर्याचा पहिला लूक आला समोर; पाहा फोटो!
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्स येथे पोहोचली आहे. कालच मुलीला घेऊन रवाना झालेल्या ऐश्वर्याचा कान्समधील पहिला लूक समोर आला आहे. यावर्षी कान्समध्ये आपल्या पहिल्या झलकसाठी ऐश्वर्याने फॅशन डिझायनर मनीष अरोराचा सुंदर स्क्वेन्सवाला ब्राइट ड्रेस निवडला आहे. एक दिवसापूर्वीच इन्स्टाग्रामवर एंट्री करणाºया ऐशने आपल्याच इन्स्टाग्राम अकाउंटवर या ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. या ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत असून, तिच्या फॉलोअर्सलाही ऐशचा हा अंदाज पसंत येताना दिसत आहे. ऐश्वर्याच्या पहिल्या लूकची सध्या चर्चा रंगली असून, आता तिला रेड कार्पेटवर बघण्यास चाहते उत्सुक आहेत. या आकाशी रंगाच्या स्क्वेंस ड्रेससोबत ऐश्वर्याने खूपच कमी मेकअप केला आहे. ऐश्वर्या कान्समध्ये कॉस्मेटिक ब्रॅण्ड लॉरियालचे प्रतिनिधित्व करीत आहे. कान्समध्ये सहभागी होण्याचे ऐशचे हे १७ वे वर्ष आहे. ऐश्वर्या अगोदर अभिनेत्री दीपिका पादुकोण १० आणि ११ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉरियाल ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करताना बघावयास मिळाली. ऐश्वर्या आज रात्री आणि रविवारी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविताना बघावयास मिळणार आहे. यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल ८ ते १९ मे दरम्यान आयोजित केला आहे. ऐश्वर्यानंतर नुकतीच विवाहाच्या बंधनात अडकलेली अभिनेत्री सोनम कपूर कान्समध्ये आपल्या अदा दाखविताना दिसणार आहे. सोनम १४ आणि १५ मे दरम्यान रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवेल.