असो, मल्लिकाविषयी बोलायचे झाल्यास सध्या ती बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. ती नेहमीच तिच्या बॉयफ्रेण्डबरोबर व्हेकेशनचे फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. मल्लिका फ्री गर्ल नावाच्या एका इंटरनॅशनल आॅर्गनायझेशनबरोबर काम करीत आहे. त्यामुळेच ती कान्समध्ये सहभागी होणार आहे.}}}} ">Cannes here I come:) #Cannesfilmfestival2017pic.twitter.com/GFw0H7g4vK— Mallika Sherawat (@mallikasherawat) May 17, 2017
Cannes 2017 : ऐश्वर्या, सोनम, दीपिकानंतर मल्लिका शेरावतचाही बघायला मिळेल जलवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 21:11 IST
फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन, सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार असून, त्यांच्याव्यतिरिक्त भारतीय फॅन्सना अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याही सौंदर्याच्या अदा बघावयास मिळणार आहेत.
Cannes 2017 : ऐश्वर्या, सोनम, दीपिकानंतर मल्लिका शेरावतचाही बघायला मिळेल जलवा!
आजपासून ७० कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून, हा फेस्टिव्हल २८ मेपर्यंत चालणार आहे. फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन, सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार असून, त्यांच्याव्यतिरिक्त भारतीय फॅन्सना अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याही सौंदर्याच्या अदा बघावयास मिळणार आहेत. मल्लिका सोनम, ऐश आणि दीपिकाप्रमाणेच रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार आहे. त्यामुळे दीपिकाप्रमाणेच मल्लिकाही रेड कार्पेटवर एंट्री करण्यास खूपच एक्साइटेड असल्याचे दिसून येत आहे. खरं तर मल्लिका कान्समध्ये सहभागी होईल की नाही, याविषयी कोणालाच फारसे माहिती नव्हते. परंतु जेव्हा मल्लिकाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयीची माहिती दिली तेव्हा अनेकांना सुखद धक्का बसला. काही वेळापूर्वीच दीपिकाचा प्रेस मिट लुक कसा तयार होईल याविषयीची माहिती आम्ही दिली होती. आता मल्लिका स्वत:च कान्सच्या रेड कार्पेटवर कशी एंट्री करणार याविषयीची माहिती सांगत असल्याचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवित आहोत. ऐश्वर्या आणि सोनम गेल्या काही वर्षांपासून कान्समध्ये सहभागी होत आहेत. २००२ ते २०११ पर्यंत या दोघीही कान्सच्या रेड कार्पेटवर झळकल्या. गेल्यावर्षी ऐश्वर्याचा पर्पल लिपस्टिक लुक मीडियामध्ये खूपच चर्चेत राहिला होता. तिच्या पर्पल ओठांमध्ये मीडियामध्ये तिला खूपच ट्रोल केले गेले होते. त्यामुळे यावेळेस लोरियल टीम ऐशच्या लुकवरून खूपच सतर्क दिसत आहेत. ऐश्वर्या १९-२० मे आणि सोनम कपूर २१-२२ मे रोजी रेड कार्पेटवर बघावयास मिळणार आहे. खरं तर या दोघींपेक्षा दीपिकाची झलक पाहण्यास फॅन्स अधिक उत्सुक आहेत. असो या भारतीय सौंदर्यवतींबरोबरच हॉलिवूडच्या जुलियन मूर आणि ईवा लॉन्गोरिया यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. त्यामुळे यावेळेस बॉलिवूड हॉलिवूडवर मात करेल काय? अशीही चर्चा यानिमित्त रंगत आहे.