‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं २७ जून रोजी आकस्मिक निधन झालं होतं. शेफाली हिच्या अकाली मृत्युमुळे मनोरंजन जगताला धक्का बसला होता. दरम्यान शेफालीच्या मृत्यूला तीन महिने उलटले तरी तिचा नवरा पराग त्यागी हा या धक्क्यातून सावरलेला नाही. तो क्षणोक्षणी शेफालीची आठवण काढत असतो. तसेच तिच्या आणवणी जागवत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
हल्लीच करवा चौथच्या निमित्ताने पराग त्यागीने शेफाली जरीवालाची आठवण काढत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये मी तिच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही आहे, असे त्याने म्हटले होते. ही पोस्ट शेअर करताना तो खूप भावूक झालेले दिसले.
पराग त्यागी याने पत्नी शेफाली जरीवाला हिचे काही जुने फोटो गोळा करून त्याचा व्हिडीओ बनवला आहे. त्याने आपल्या अकाऊंटवर हा फोटो शेअर केला. त्यावर त्याने लिहिले की, मी नेहमी तुझी वाट पाहीन. तुझ्यासाठी मला आकाशात यावं लागलं तरी ठीक, पण तिथेही जर मी तुला शोधू शकलो नाही तर मी तुला शोधण्यासाठी विनंती करेन. तसेच तू माझी आहेस या वचनाची मी तुला आठवण करून देईन.
पराग त्यागी याने पुढे लिहिलं की, माझं प्रेम हे नेहमी तुझंच राहील, कोण काय म्हणेल, याला काही अर्थ नाही. तू नेहमी माझीच राहशील, मी नेहमी तुझी वाट पाहीन. मी तुला तिथेच भेटेन. तसेच आता त्या वेळाची वाट पाहवत नाही आहे. प्लिज मला जेवढं लवकर होईल, तेवढं लवकर तुझ्याकडे बोलावून घे. मी तुझ्याविना श्वासही घेऊ शकत नाही, अशा शब्दात परागने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Web Summary : Parag Tyagi, husband of late actress Shafali Jariwala, shares a heartfelt post expressing his grief. He longs to reunite with her, stating he can't breathe without her. He shared a video of her old photos.
Web Summary : दिवंगत अभिनेत्री शेफाली जरीवाला के पति पराग त्यागी ने एक भावुक पोस्ट शेयर की है, जिसमें उन्होंने अपना दुख व्यक्त किया है। उन्होंने उसके साथ फिर से मिलने की इच्छा जताई है, और कहा है कि वह उसके बिना सांस नहीं ले सकते। उन्होंने उनकी पुरानी तस्वीरों का एक वीडियो साझा किया।