Join us
Daily Top 2Weekly Top 5

शौक बडी चिज हैं...नीता अंबानींनी खरेदी केली Rolls-Royce आलिशान गाडी, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 08:30 IST

निता यांच्या कार कलेक्शनचीही विशेष चर्चा रंगत असते.

देशातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचं नाव येतं. जागतिक पातळीवरही त्यांच्या व्यवसाय आणि श्रीमंतीची दखल घेतली जाते. अशा या गर्भश्रीमंत कुटुंबाविषयी कायमच सर्वसामान्यांना कुतूहल वाटतं. देशातील सर्वात लक्षवेधी महिलांपैकी एक असणाऱ्या नीता अंबानी या त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखल्या जातात.  निता यांच्या कार कलेक्शनचीही विशेष चर्चा रंगत असते.  नीता अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. आता या कार कलेक्शनमध्ये आणखी एक शानदार कार अॅड झाली आहे.

नीता अंबानी यांची नवी आलिशान गाडी  VIII (Rolls Royce Phantom VIII) खरेदी केली आहे. नीता अंबानींच्या नव्या गाडीची देखील किंमत ही कोट्यावधी रुपयांची आहे. या गाडीची किंमत 12 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. या गाडीच्या रंगानं आणि तिच्या इंटिरियरनं सर्वांच लक्ष वेधलं आहे. या गाडीवर असलेलं स्पिरिट ऑफ एक्स्टसी हे देखील सोन्याचं बनवण्यात आलं आहे. गाडीची खास गोष्ट म्हणजे गाडीच्या हेडसेटवर नीता अंबानींच्या नावाचे इनशीअल आहे. त्यामध्ये NMP म्हणजे नीता मुकेश अंबानी हे नाव इंग्रजीत लिहिण्यात आलं आहे. या गाडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अंबानी कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब असून त्यांच्या 15 हजार कोटी रुपयांच्या घरात भव्य गॅरेज आहे. यात जगभरातील महागड्या कार्सचा समावेश आहे.  त्यांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित कारचा समावेश असतो. गेल्या दिवाळीला मुकेश अंबानी यांनी निता यांना काळ्या रंगाची रोल्स-रॉयस कलिनन ही महागडी कार गिफ्ट केली होती. या कारची किंमत एक-दोन कोटी नाही तर तब्बल 10 कोटी रुपये इतकी होती. तसेच अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये फेरारी पुरोसांग्यू, बुलेटप्रूफ मर्सिडीज-बेंज S-क्लास, रेंज रोवर LWB अशा अनेक आलिशान गाड्या आहेत.

टॅग्स :नीता अंबानीमुकेश अंबानीकार