Join us

ब्रुना अब्दुल्लाला मिळाले ‘बिग सरप्राईज’! नाही रोखू शकली आनंदाश्रूू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 06:55 IST

बहुतांश बॉलिवूड स्टार्स पडद्यामागेही पडद्यावरचे आयुष्य जगतात. होय, अगदी पडद्यावर जगतात इतकेच ग्लॅमरस, रोमॅन्टिक. ताजे उदाहरण अभिनेत्री  ब्रुना अब्दुल्ला हिचेच घेता येईल.

बहुतांश बॉलिवूड स्टार्स पडद्यामागेही पडद्यावरचे आयुष्य जगतात. होय, अगदी पडद्यावर जगतात इतकेच ग्लॅमरस, रोमॅन्टिक. ताजे उदाहरण अभिनेत्री  ब्रुना अब्दुल्ला हिचेच घेता येईल. ‘ग्रँड मस्ती’ फेम ब्रुना अब्दुल्ला  सध्या तिच्या बॉयफ्रेन्डसोबत स्वित्झर्लंडच्या नयनरम्य वातावरणात फिरताना दिसतेय. याचदरम्यान ब्रुनाच्या बॉयफ्रेन्डने तिला असे काही सरप्राईज दिले की, तिला अश्रू अनावर झालेत. होय, सध्या ब्रुना व तिच्या बॉयफ्रेन्डचा स्वित्झर्लंडमधील एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे. एका दिवसांत या व्हिडिओला ७६ हजारांवर व्ह्युज मिळाले आहेत. आता या व्हिडिओत असे काय आहे? बॉयफ्रेन्डने  ब्रुनाला असे काय सरप्राईज दिले? हे तर जाणून घ्यायला हवेच. तर ब्रुनाच्या बॉयफ्रेन्डने तिला अशा काही अंदाजात प्रपोज केले की, तिला स्वत:च्या भावना रोखणे कठीण झाले. गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केले आणि हे बघून ब्रुनाच्या डोळ्यांतून आंनदाश्रू ओघळू लागले. 

ब्रुना अशी भावूक झालेली बघून तिच्या प्रियकराने तिचा कवेत घेतले. यानंतर अर्थातचं प्रियकराचे प्रपोजल ब्रुनाने स्वीकारले आणि ती एन्गेज्ड झाली.ब्रुना ही ब्राझिलची राहणारी आहे. खरे तर ती मुंबर्ईत पर्यटक म्हणून आली होती. पण काही दिवसांतचं मायानगरी तिला खुणावू लागली. याकाळात काही जाहिरातींमधून तिने आपले अ‍ॅक्टिंग करिअर सुरू केले. शेखर सुमनसोबत तिचा सर्वात पहिला व्हिडिओ आला. ‘मेरे गम के दायरे में’ असे या अल्बमचे नाव होते. यानंतर अनुभव सिन्हांच्या ‘कॅश’ या चित्रपटात ती एका आयटम नंबरवर थिरकताना दिसली. यानंतर ‘देसी ब्यॉईज’मध्येही एक डान्स सिक्वेन्स करताना दिसली. ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली. ब्रुनाने साऊथ आणि बॉलिवूड दोन्ही ठिकाणी काम केले. अर्थात तिला म्हणावे तसे यश लाभले नाही.