भाई मिस करणार गणेश चतुर्थी सेलिब्रेशन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 11:48 IST
सलमान खान कुटुंबीय दरवर्षी गणेश चतुर्थी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. यादिवशी जर भाई इतर कुठे गेला असेल ...
भाई मिस करणार गणेश चतुर्थी सेलिब्रेशन ?
सलमान खान कुटुंबीय दरवर्षी गणेश चतुर्थी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. यादिवशी जर भाई इतर कुठे गेला असेल तर मग खास गणपती बसवण्यासाठी तो घरी परत येत असतो. गेल्यावर्षी तो नाशिक येथे गणपती विसर्जनाला मिरवणुकीत नाचलाही होता.पण, असे वाटतेय की, यंदाचे गणेश चतुर्थी सेलिब्रेशनसाठी त्याला येता येणार नाही. कारण, तो सध्या ‘ट्युबलाईट’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कबीर खानने एक नोटीस जाहीर केली आहे.त्याला मनाली येथील ‘ट्यूबलाईट’चे शूटींग पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांना सेटवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कारण नंतर सलमान भाई ‘बिग बॉस 10’ च्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे.