Join us

ब्री लारसन हिला 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 11:01 IST

 मिस परफेक्शनिस्टमानवतेचा खरा अर्थ उमजेल, अशी भूमिका ब्री लारसन हिला करायची आहे. 'रुम' या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री ...

 मिस परफेक्शनिस्टमानवतेचा खरा अर्थ उमजेल, अशी भूमिका ब्री लारसन हिला करायची आहे. 'रुम' या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री या श्रेणीत 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड' मिळाला आहे. याबाबत ती सांगते की, सर्वसाधारण भूमिका मी कधीच स्वीकारत नाही. ज्या भूमिकेतून मानवतेचा खरा अर्थ देता येईल, अशाच भूमिकेला ती प्राधान्य देणार आहे. 'रूम'मध्ये तिने अपहृत आईची भूमिका साकारली आहे. यात आईचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.पेन वादाच्या भोवर्‍यातअभिनेता सीन पेनचे म्हणणे आहे की, अमली पदार्थांचा व्यवहार करणारा जोएकिन अल चापो गुजमॅन याच्या भेटीबाबत लपविण्यासारखी कुठलीच बाब नाही. एका साप्ताहिकात सीन पेनचा गुजमॅनसोबतचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेव्हापासून सीन पेनवर पाळत ठेवली जात आहे. मात्र यानंतर सीन पेनने एका वृत्तसंस्थेला ई-मेल पाठवून गुजमॅनसोबतच्या संबंधाचे खंडन केले आहे. गेल्या शुक्रवारी गुजमॅनला अटक करण्यात आल्याने अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात पेनची गुजमॅनसोबत भेट झाल्याची चर्चा आहे.संकल्प तोडलागायक जस्टिन बीबर याने धूम्रपान न करण्याचा संकल्प केल्याचे जाहीर केले होते. मात्र आठवडाभरातच तो धूम्रपान करताना आढळून आला आहे. 'द बर्ट शो'मध्ये त्याने नव्या वर्षात आपण धूम्रपान न करण्याचा संकल्प करतो, असे सांगितले होते. धूम्रपानामुळे माझ्या आरोग्यावर परिणाम होत असून, माझी प्रतिमा देखील यामुळे मलिन होत असल्याचे तो म्हणाला होता. मात्र त्याचा हा संकल्प फार काळ टिकला नाही.