Join us

बाॅलीवूडच्या पिचवर 'ब्रेट ली' सुस्साट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:42 IST

ऑगस्टमध्ये अनइंडियन भारतभर प्रदर्शित होणार

ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेट ली बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला असून 'अनइंडियन' हा त्याचा सिनेमा 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटात तनिष्ठा चटर्जी त्याची हिरॉइन आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये चित्रीकरणास सुरूवात झाली होती, आता चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. गेल्या वर्षी चित्रीकरण संपले आणि यंदाच्या कान्स महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात आला. आता ऑगस्टमध्ये अनइंडियन भारतभर प्रदर्शित होणार आहे.ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालेल्या व निर्माता असलेल्या अमुपम शर्माने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ऑस्ट्रेलियन टीचर विल आणि भारतीय सिंगल मदर मीरा यांच्यातील ही प्रेमकहाणी आहे. भारतीय ऑस्ट्रेलियन जोडपं स्वीकारणं अगदी अनिवासी भारतीयांनाही कसं जड जातं हे यात दाखवण्यात आलं आहे.गुलशन ग्रोव्हर व सुप्रिया पाठक यांच्यासह अनेक भारतीय व ऑस्ट्रेलियन कलाकार या चित्रपटात आहेत. सलीम सुलेमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. 
अनइंडियनचं ट्रेलर.