Join us

'ब्रीथ' फेम अभिनेता अमित साधने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 20:59 IST

Amit Sadh : अभिनयात सारं काही सुरळीत सुरू असताना अमितने ब्रेक का घेतला याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खान(Salman Khan)सोबत 'सुलतान' (Sultan) या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर 'ब्रीथ - इनटू द शॅडोज'(breathe into the shadows)मध्ये इन्स्पेक्टर कबीर सावंत आणि 'अव्रोध : द सीज विदिन' या वेब सिरीजमध्ये मेजर विदीप सिंग साकारणाऱ्या अमित साध(Amit Sadh)ने नुकताच अभिनयातून ब्रेक घेतला आहे. अभिनयात सारं काही सुरळीत सुरू असताना अमितने ब्रेक का घेतला याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

अमित साध नेहमीच मानसिक आरोग्य सांभाळून काम करण्याला महत्त्व देतो. मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी ब्रेक घेणं आणि स्वत:ला कामापासून डिस्कनेक्ट करणं आवश्यक असल्याचं तो मानतो. याबाबत एका मुलाखतीत तो म्हणाला की, मी सलग सात महिने काम करत आहे. माणूस म्हणून मला स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी, स्वतःसाठी वेळ हवा आहे. मी रिचार्ज होऊन पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होईन असंही अमित म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, मी झाडांना स्पर्श करतो, थंड तलावांमध्ये पोहतो आणि अनोळखी व्यक्तींकडे पाहून हसतो, जे मला जगाच्या जवळ आणते. मी पर्वतांना माझा देव आणि निसर्गाला माझी आई म्हणतो कारण ही कल्पना मी कालांतराने विकसित केली आहे. माझी आवडती ओळ आहे – पृथ्वी एक शिक्षक आहे.

टॅग्स :अमित संध