Join us

अभिनयापासून ब्रेक घेतेय - सोनाली बेंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:58 IST

आमीर खानसोबत 'सरफरोश' चित्रपट उत्तमरित्या साकारणारी सोनाली बेंद्रे आता बॉलीवूडमधून ब्रेक घेऊ इच्छित आहे. २00५ मध्ये तिने मुलाला जन्म ...

आमीर खानसोबत 'सरफरोश' चित्रपट उत्तमरित्या साकारणारी सोनाली बेंद्रे आता बॉलीवूडमधून ब्रेक घेऊ इच्छित आहे. २00५ मध्ये तिने मुलाला जन्म दिला असून ती टीव्हीवर 'अजीब दास्ताँ है ये' मध्ये दिसली होती. ती म्हणते,' मी गेल्या वर्षी एक कथेवर आधारित शो केला होता. पण, मी आता थोडा काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेताना आनंदी आहे. माझ्यासाठी ते काही प्रमाणात जड जाऊ शकते. पण, मी स्वत:ला बदलेन. आणि पुन्हा परतेनही कदाचित. अभिनय तुम्हाला तुमची व्यक्तिरेखा सांभाळून अभिनय साकारण्याचा आनंद देतो. एखाद्या कलाकारासाठी हीच त्याच्या अभिनयाची पावती.