लता मंगेशकर यांना ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 18:14 IST
आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी गायिका लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड प्रदान ...
लता मंगेशकर यांना ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड
आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी गायिका लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड प्रदान करण्यात आला. लता मंगशेकर यांनी नुकतेच आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराविषयी सोशलमीडियावर ट्वििट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पुरस्काराचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्यांना या मिळालेल्या पुरस्कारासाठी सोशलमीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. त्यामुळे भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर ट्विटरवर फोटो शेअर करताना त्या आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतात की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. तसेच त्यांच्या नंतरच्या ट्विटमध्ये त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. माज्या कामावर मी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. लता मंगेशकर यांनी आतापर्यंत ३०,००० हूनही अधिक गाणी गायली आहेत. त् १९४२ मध्ये लता दीदींनी मराठी गाण्यापासून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९४६ मध्ये वसंत जोगळेकर यांच्या हिंदी सिनेमातून त्यांनी पहिले हिंदी गाणे गायले. दोन वर्षांनंतर गुलाम हैदर यांनी लतादीदींना दिल मेरा तोडा या गाण्यातून मोठा ब्रेक दिला. त्यानंतर लतादीदींना मागे वळून पाहिले नाही. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही २०१२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, नोबल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल शूमाकरला द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. }}}}