Join us

कंगनाचा दावा, मिस ज्युलिया पात्र काल्पनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 18:36 IST

आपण करीत असलेली रंगून चित्रपटातील मिस ज्युलिया ही भूमिका संपूर्णत: काल्पनिक असून, त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध ...

आपण करीत असलेली रंगून चित्रपटातील मिस ज्युलिया ही भूमिका संपूर्णत: काल्पनिक असून, त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नसल्याचे अभिनेत्री कंगना राणौतने म्हटलं आहे.रंगूनमध्ये कंगना साकारत असलेली मिस ज्युुलिया ही भूमिका ४० व्या दशकात गाजलेल्या फिअरलेस नादिया हिच्यासारखीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १९३० आणि १९४० व्या दशकात आॅस्ट्रेलियन स्टार नादियाने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. तिच्यापासून प्रेरणा घेऊन मिस ज्युलियाची भूमिका साकारल्याचा आरोप करीत या चित्रपटाविरुद्ध न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.कंगनाने या संपूर्ण प्रकरणापासून स्वत:ला वेगळे केले. मिस ज्युलियाची भूमिका ही काल्पनिक आहे. कोणत्याही चरित्रापासून घेतलेले हे पात्र नाही. सध्या याबाबत न्यायालयीन वाद असून, मी बोलणे औचित्याचे नाही. परंतु मी इतके सांगू शकते की, हे पात्र काल्पनिक असून, कोणत्याही जिवंत अथवा मयत व्यक्तीशी साधर्म्य राखणारे नाही.’मिस ज्युलिया ही ’ब्लडी हेल’ या शब्दाचा वापर करीत असे. जो फिअरलेस नादियाने यापूर्वी वापरलेला आहे. १९३५ साली हंटरवाली म्हणून नादिया ही प्रसिद्ध होती. फिअरलेस नादियाचे मुळ नाव मेरी अ‍ॅन इव्हान्स असे होते. अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. १९९६ साली त्या वयाच्या ८८ व्या वर्षी वारल्या. रंगून हा चित्रपट दुसºया महायुद्धावर आधारित आहे. या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.