Join us

#boycottkareenakapoorkhan ट्विटरवर होतोय ट्रेंड, जाणून घ्या हे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 15:40 IST

करीना कपूरकडे सध्या पाच ते सहा बिग बजेट प्रोजेक्ट आहेत.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर लवकरच आमीर खान सोबत लाल सिंग चड्ढा चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट रिलीज झाला नाही तोवर तिच्या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसते आहे. करीनाकडे सध्या पाच ते सहा बिग बजेट प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी एक म्हणजे रामायण. या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी करीनाला विचारण्यात आले आहे. मात्र या भूमिकेसाठी तिने तब्बल १२ कोटींची मागणी केली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर गेल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. हा प्रोजेक्ट लांबणीवर गेल्यामुळे काही लोक वैतागले आहेत आणि त्यांनी करीनाला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

करीना कपूरला रामायणावर आधारीत या चित्रपटाची पटकथा भावली आणि तिने चित्रपटासाठी लगेच होकारही दिला. सुरूवातीला तिने या चित्रपटासाठी १० कोटी रुपयांचे मानधन मागितले होते. निर्मात्यांनी तेवढे पैसे देण्याची तयारी देखील केली होती. मात्र आता तिने आणखी दोन कोटी रुपये वाढवून १२ कोटी रुपये मागितले आहेत. जास्त पैशांची मागणी केल्यामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर गेला. त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

सोशल मीडियावर करीना कपूरला बॉयकॉट केले जात आहे. युजर्स कमेंट करत आहेत की करीनाला आता सीतेची भूमिका केली नाही पाहिजे. बॉयकॉट करीना कपूर खान हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतो आहे.  

सीता ही एक पवित्र व्यक्तिरेखा आहे. हिंदू लोकांसाठी आदरास्थानी असलेल्या सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीनासारखी लालची अभिनेत्री घेणे चुकीचं आहे. या भूमिकेसाठी एक हिंदूच अभिनेत्री घ्या अशी मागणी संतापलेले नेटकरी करत आहेत.

तसेच  #BoycottKareenaKhan असे म्हणत तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. हा चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे.

टॅग्स :करिना कपूरआमिर खान