Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिसवर युद्ध सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:54 IST

बाजीराव मस्तानी- दिलवालेमध्ये थेट लढत आजपासून बॉक्स ऑफिसवर या वर्षाचे सर्वात मोठे युद्ध सुरू झाले आहे. या सामन्यात एकीकडे ...

बाजीराव मस्तानी- दिलवालेमध्ये थेट लढत आजपासून बॉक्स ऑफिसवर या वर्षाचे सर्वात मोठे युद्ध सुरू झाले आहे. या सामन्यात एकीकडे शाहरुखखानचा चित्रपट 'दिलवाले' तर दुसरीकडे संजय लीला भंसाळीचा 'बाजीराव मस्तानी' आहे. दोन्ही चित्रपटांच्या टीमने प्रमोशन साठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दोघांकडूनही बिग हिटचे दावे केले जात आहेत. कोणाचा दावा खरा ठरणार, प्रेक्षकांच्या पसंतीवर कोण बाजी मारणार, हे येणारा काळ सांगेलच.परंतु या संघर्षामुळे प्रेक्षकांचे विभाजन होणार, हे ठरेलेल आहे. यात दोन्ही चित्रपटांचे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दोन्ही चित्रपटात हा संघर्ष नसता तर ते दोघांसाठीही फायद्याचे होते. मात्र आता आता असा विचार करून काहीच उपयोग नाही. तसेही दोघांचे विषय वेगवेगळे आहेत. 'दिलवाले' हा एक मसालेदार मनोरंजक चित्रपट आहेत तर 'बाजीराव मस्तानी' ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर तयार झालेली एक त्रिकोणीय प्रेमकथा आहे. तुलनाच करायची म्हटले तर रोहित शेट्टीच्या निर्देशनात बनलेल्या 'दिलवाले'मध्ये ते सर्व काही आहे, जे त्यांच्या चित्रपटात नेहमी पाहायला मिळते. तेच कारांचे हवेत उडणे, तेच कॉमेडीचे पंच आणि सोबतच इमोशनचा तडका. सोबतच शाहरुखखान आहे आणि त्यातही मोठी गोष्ट अशी की शाहरुखखान आणि काजोल यांची जोडी खूप वर्षांनंतर पडद्यावर परत येत आहे. या जोडीला बॉलिवूडमधील यशस्वी रोमांटिक जोडी मानले जाते. या जोडीचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट राहिले आहेत. सोबत युवा दर्शकांच्या पसंदीत वरुणधवण आणि त्यांच्या सोबत कीर्ती सेननही आहे. ही युवा जोडी देखील चित्रपटाच्या यशासाठी फायदेशीर ठरू शकते. बाजीराव मस्तानीच्या बाबतीत सांगायचे, तर त्यासाठी मोठी गोष्ट पीरियड चित्रपटांप्रती संजय लीला भंसाळीची विशेष आवड आहे. ते याप्रकारच्या चित्रपटांना भव्यतेसोबत पडद्यावर आणणारे चॅम्पियन मानले जातात. बाजीराव मस्तानीदेखील भव्यताच्या बाबतीत कुठेच कमी नाही. चित्रपटाच्या सेट डिझाईनवर बरीच मेहनत घेण्यात आली आहे. बाजीराव मस्तानीच्या कलाकारांची फौजही मोठी आहे. रणवीर सिंह कसा कसलेला कलावंत आहे हे त्याने रामलीलामध्ये दाखविले होते. रामलीलासारखीच यावेळी देखील त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आहे. दोघांचे वैयक्तिक नाते देखील कायम चर्चेत राहिले आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीला चित्रपटाच्या यशासाठी महत्त्वाचे मानले जाते. काशीबाईच्या रोलमध्ये प्रियंका चोपडा आहे. तिचा रोलही दमदार आहे. पडद्यावर काशीबाई आणि मस्तानीच्या नृत्याला विशेष पसंती लाभत आहे. दिलवालेबाबत बोलायचे झाले तर, त्यासाठी शाहरुखखानच्या असहिष्णुताबाबत दिलेली प्रतिक्रियेचादेखील विचार करायला हवा. या वादाचा चित्रपटाच्या कारभारावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी शंकाही काही जण व्यक्त करीत आहेत.चित्रपट तज्ज्ञांच्या नजरा दोन्ही चित्रपटांच्या परिणामांवर आहेत. प्रदर्शनानंतरही या दोन्ही चित्रपटांबाबत थियटरबाहेरच्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. जाणकारांच्या दृष्टीने दोन्ही चित्रपटांची टक्कर बरोबरीची मानली जात आहे. आता निर्णय प्रेक्षकांच्या कोर्टात आहे.