Join us

Box office : पाहा दहा दिवसांत ‘रईस’ने किती केली कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 15:11 IST

गेल्या वीकेण्डला रिलिज झालेल्या शाहरूख खान याच्या ‘रईस’ या सिनेमाने हृतिक रोशनच्या ‘कबाली’ला जबरदस्त फाइट देत मुसंडी मारली आहे. ...

गेल्या वीकेण्डला रिलिज झालेल्या शाहरूख खान याच्या ‘रईस’ या सिनेमाने हृतिक रोशनच्या ‘कबाली’ला जबरदस्त फाइट देत मुसंडी मारली आहे. सातव्याच दिवशी शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवणाºया रईसने दहाव्या दिवसांपर्यंत ११४.५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. तर काबिल आतापर्यंत केवळ ६९.५० कोटी रुपयांपर्यंतच कमाई करू शकला आहे. शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या रईसला सुरुवातीला चित्रपट समीक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. शाहरूखची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडणार नाही, असेही म्हटले गेले. त्या तुलनेत काबिलमधील हृतिकच्या अभिनयाचे गोडवे गायिले गेले. सर्वांकडूनच त्याच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. परंतु कमाईच्या बाबतीत शाहरूखचा रईसच सरस ठरल्याने काबिलच्या कौतुकावर पाणी फेरले गेल्याचे दिसत आहे. रईस २७०० स्क्रीन्सवर दाखविण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने शाहरूखच्या आतापर्यंतच्या सिनेमांच्या कमाईच्या तुलनेत ३५ टक्के घसरण झाली होती. अर्थात कमी स्क्रिन्स मिळाल्यानेच त्याचा कमाईवर परिणाम झाल्याचे बोलले गेले. अशातही काबिलच्या तुलनेत आतापर्यंत रईसने बॉक्स आॅफिसवर चांगले कलेक्शन केले आहे. २५ जानेवारी (बुधवार) रोजी रिलिज झालेल्या रईसने पहिल्याच दिवशी २०.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसºया दिवशी २६.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार मात्र सिनेमासाठी फारसा लकी ठरला नाही. सिनेमा अनुक्रमे १३ कोटी, १५.५० कोटी आणि १७.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. बॉक्स आॅफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार शाहरूखचा हा सिनेमा भारताच्या तुलनेत विदेशात चांगला बिझनेस करीत आहे.रईसमधून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. मात्र सिनेमातील तिचा सहभाग वादाच्या भोवºयात सापडल्याने तिला सिनेमाच्या प्रमोशनपासून दूर राहावे लागले. केवळ एकदाच ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सिनेमाचे भारतात प्रमोशन करताना बघावयास मिळाली. यावेळी शाहरूख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीही उपस्थित होते. यावेळी माहिराने म्हटले होते की, रईस लवकरच पाकिस्तानात रिलिज केली जाणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, ज्या पद्धतीने रईसची जगभरात प्रतीक्षा केली जात आहे, त्याचप्रकारे पाकिस्तानातही प्रेक्षक रईसची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर मला विश्वास आहे की, हा सिनेमा पाकिस्तानात चांगली कमाई करण्यात यशस्वी होईल. रईसची कथा १९८० मध्ये गुजरातमध्ये फोफावलेल्या माफिया राजवर अवलंबून आहे. सिनेमात शाहरूख खानची नकारात्मक भूमिका दाखविण्यात आली आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी हा पोलिसाच्या भूमिकेत आहे.