Join us

BOX OFFICE : सलमानचा ‘टायगर जिंदा है’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 16:51 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. या चित्रपटाने जगभरात ...

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. या चित्रपटाने जगभरात पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर पाचशे कोटींचा गल्ला जमविणारा सलमानचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. या अगोदर ‘बजरंगी भाईजान आणि सुलतान’ या दोन चित्रपटांनी हा कारनामा केला आहे. बॉक्स आॅफिस इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘टायगर जिंदा है’ बॉलिवूडमधील सातवा हायएस्ट वर्ल्डवाइल्ड ग्रोसर चित्रपट बनला आहे. रिलीजच्या १८ व्या दिवसापर्यंत चित्रपटाने ५१९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे सलमानच्या या चित्रपटाला आॅल टाइम वर्ल्डवाइड बॉलिवूड ग्रोसर चित्रपटांच्या यादीत सातवे स्थान मिळाले आहे. लवकरच हा चित्रपट ‘धूम-३’ चे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. ‘धूम-३’च्या नावे ५२४ कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन आहे. -  बाहुबली- द कन्क्लूजन  - ८०२ कोटी-  दंगल  - ७०२ कोटी-  पीके  - ६१६ कोटी-  बजरंगी भाईजान  - ६०४ कोटी-  सुलतान - ५८१ कोटी-  धूम 3  - ५२४ कोटी- टाइगर जिंदा है  - ५१९ कोटी (१८ दिवस)- चेन्नई एक्स्प्रेस - ३९६ कोटी- दिलवाले - ३७२ कोटी- प्रेम रतन धन पायो  - ३६५ कोटीदरम्यान, ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स आॅफिसवर पहिल्याच आठवड्यात २०६ कोटी रुपयांची कमाई केली. दुसºया आठवड्यात ८५ कोटी रुपयांची कमाई करीत बॉक्स आॅफिसवरील जोर कायम ठेवला. तिसºया आठवड्यात चित्रपटाने १७.६१ कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स आॅफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या १८ व्या दिवशी चित्रपटाने २.७५ कोटी रुपये कमाविले. आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास ३११.७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.