#Hichki withstands the #Baaghi2 wave... Stays SUPER-STRONG on second Fri... Biz expected to grow over the weekend... [Week 2] Fri 2.40 cr. Total: ₹ 28.50 cr. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) March 31, 2018दरम्यान, ‘हिचकी’ हा चित्रपट केवळ ९८६ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. पाच दिवसांत चित्रपटाने निर्मितीचा खर्च वसूल केला. यशराज बॅनरचा हा चित्रपट २० कोटी रूपयांमध्ये बनविला आहे. चित्रपटात राणी मुखर्जी व्यतिरिक्त एकही बडा स्टार नाही. अशातही जबरदस्त अभिनय आणि कथेच्या जोरावर चित्रपटाने प्रेक्षकांना आपलेसे केले. दरम्यान, ‘बागी-२’मुळे चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली आहे. राणी २०१४ मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटात एका दबंग पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. तब्ब्ल चार वर्षांनंतर राणीने पडद्यावर दमदार कमबॅक केले. राणीच्या ‘हिचकी’ने अजय देवगणच्या ‘रेड’ला जबरदस्त टक्कर दिली.
BOX OFFICE : आठच दिवसांत बॉक्स आॅफिसवर ‘हिचकी’ बनली ‘राणी’, रेकॉर्डब्रेक केली कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 17:53 IST
२३ मार्च रोजी प्रदर्शित झालेला अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत येत आहे. चित्रपटात एका शिक्षिकेची ...
BOX OFFICE : आठच दिवसांत बॉक्स आॅफिसवर ‘हिचकी’ बनली ‘राणी’, रेकॉर्डब्रेक केली कमाई!
२३ मार्च रोजी प्रदर्शित झालेला अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत येत आहे. चित्रपटात एका शिक्षिकेची भूमिका साकारणाºया राणीने पुन्हा एकदा बॉक्स आॅफिसवर आपली जादू दाखवून दिली आहे. राणीच्या या चित्रपटाने हिट कॅटेगिरीत स्थान मिळविले असून, अजूनही कमाईचा जोर कायम आहे. या शुक्रवारी टायगर श्रॉफच्या ‘बागी-२’च्या प्रदर्शनानंतरही राणीच्या ‘हिचकी’ने २.४० कोटी रूपयांची कमाई केली. दरम्यान, पहिल्याच दिवशी ‘हिचकी’ने केवळ ३.३० कोटी रूपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारपासून (५.३५ कोटी) चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आपली पकड मजबूत केली. रविवारी चित्रपटाने ६.७० कोटी, सोमवारी २.४० कोटी, मंगळवारी २.३५ कोटींची कमाई केली. कमाईचा जोर कायम ठेवत चित्रपटाने बुधवारी २.४० कोटींचे कलेक्शन केले. गुरुवारी अचानकच चित्रपटाचे कमाईत वाढ होताना ३.४० कोटींचा गल्ला जमविला, तर शुक्रवारी २.४० कोटींची कमाई करीत बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा कायम ठेवला. आतापर्यंत चित्रपटाने २८.५० कोटींची कमाई केली.