Join us

Box office clash alert!​ या दिवाळीत रंगणार आमिर खान अन् अक्षय कुमारचा संघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 15:02 IST

आमिर खानचा चित्रपट यायचा म्हटला की, बॉक्सआॅफिसलाही धडकी भरते, मग इतरांचे काय? आमिर येणार आहे म्हटले की, सगळेजण जणू ...

आमिर खानचा चित्रपट यायचा म्हटला की, बॉक्सआॅफिसलाही धडकी भरते, मग इतरांचे काय? आमिर येणार आहे म्हटले की, सगळेजण जणू शांतपणे त्याच्या जाण्याची प्रतीक्षा करत बसतात. अर्थात बॉक्सआॅफिसवर असे चित्र नसेल. कारण यंदाच्या दिवाळीत अक्षय कुमार अन् रजनीकांत हे दोघे आमिर खानला बॉक्सआॅफिसवर तगडी फाईट देणार आहेत.होय, आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमार व रजनीकांत स्टारर ‘2.0’आणि आमिरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ या दोन चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. दिवाळीच्याच मुहूर्तावर अजय देवगणचा ‘गोलमाल4’ रिलीज होणार होता. पण अक्षयचा बिग बजेट ‘2.0’ रिलीज होणार हे पाहून ‘गोलमाल4’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने पाय मागे घेतले. पण आमिर पाय मागे घेणाºयापैकी नाहीच. त्यामुळे ही दिवाळी आमिरच्या एन्ट्रीमुळे कुणाला कशी आणि किती भारी पडते, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.‘सीक्रेट सुपरस्टार’ हा आमिरच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. यापूर्वी आमिरच्या या सिनेमाच्या रिलीजसाठी ४ आॅगस्टचा मुहूर्त ठरला होता. याच दिवशी संजय दत्तचा ‘भूमी’ रिलीज होणार आहे. अर्थात संजयने आमिरला आपला चांगला मित्र आहे, असे सांगून ‘भूमी’ची रिलीज डेट बदलण्याची तयारी दर्शवली होती. पण आता ‘सीक्रेट सुपरस्टार’ची रिलीज डेट बदलल्याचे पाहून संजयने आमिरचे आभार मानले आहेत. या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतो आहे. अद्वैत आधी आमिरचा मॅनेजर होता.