Join us

'बॉर्डर २' मध्ये वरुण धवन 'रिअल हीरो'ची भुमिका साकारणार, नाव ऐकूनच शत्रू थरथर कापतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:51 IST

जखमी होऊनही ८९ पाकिस्तानी सैनिकांचा केला होता खात्मा, मरणोत्तर 'परमवीर चक्र' पुरस्कारानं सन्मानित!

Border 2 Varun Dhawan Role: 'बॉर्डर' हा चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून बघतात. ब्लॉकबस्टर अशा या चित्रपटाचा सिक्वल लवकच येणार आहे. 'गदर २' च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलने 'बॉर्डर २' ची घोषणा केली होती.  या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे.  या चित्रपटात वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसारखे अनेक स्टार दिसणार आहेत. यातच वरुण धवनच्या भूमिकेबाबत एक अपडेट आली आहे. 

मिड डेनुसार, वरुण धवन हा मेजर होशियार सिंग दहिया यांची भूमिका साकारत आहे. मेजर होशियार सिंग हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शौर्यवीर होते, ज्यांना त्यांच्या अद्वितीय पराक्रमासाठी मरणोत्तर 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आलं होतं. वरुण धवन या भूमिकेसाठी दोन महिने प्रचंड मेहनत घेत असल्याची माहिती आहे. वरुण धवनच्या व्यक्तिरेखेचा प्रवास हरियाणातील सिसना गावातून सुरू होतो आणि नंतर तो भारत-पाकिस्तान युद्धापर्यंत दाखवला जाणार आहे. 

मेजर होशियार सिंग यांच्याबद्दल...

१९५७ मध्ये त्यांनी जाट रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९६५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १७ डिसेंबर १९७१ मध्ये शंकरगड पठारावर बसंतर मोर्चा सांभाळताना दाखवलेले पराक्रम हे त्यांचे सर्वात मोठे योगदान ठरले. या मोहिमेदरम्यान २० पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी बंदी बनवले आणि जारवाल गावावर यशस्वी ताबा मिळवला. १७ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूच्या तीव्र हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तरीही त्यांनी लढा सुरुच ठेवला आणि पाकिस्तानच्या कमांडिंग ऑफिसरलाही ठार केलं. या अदम्य शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आलेलं आहे. हा भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे, जो शत्रूच्या उपस्थितीत अत्यंत शौर्य किंवा आत्मत्यागासाठी दिला जातो.  

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडसनी देओलसीमारेषा