बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी 'बॉर्डर २' (Border 2 Movie) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'जाट'(Jaat Movie)मधील त्याचा धमाकेदार अॅक्शन पाहिल्यानंतर चाहते आता त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. दरम्यान, सनी देओलने स्वतः त्याच्या आगामी 'बॉर्डर २' चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे.
सनी देओलने अलिकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत 'बॉर्डर २' चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, मी 'बॉर्डर २' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. आशा आहे की आम्ही पुढील २ ते ३ महिन्यांत शूटिंग पूर्ण करू. पुढील २६ जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. सर्वजण कठोर परिश्रम करत आहेत, आशा आहे की एक चांगला चित्रपट बनेल.
'बॉर्डर २'च्या सेटवरील फोटो आले समोरयापूर्वी, 'बॉर्डर २'मधील सनी देओलचा फर्स्ट लूकही समोर आला होता. काही काळापूर्वी अभिनेता डेहराडूनमधील हल्दूवाला येथे चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान, उत्तराखंड चित्रपट विकास परिषदेचे सीईओ बंशीधर तिवारी यांनी सेटला भेट दिली आणि सनी देओलची भेट घेतली. त्यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये सनी देओलचा चित्रपटातील फर्स्ट लूक दिसत होता. फोटोंमध्ये, सनी लष्करी गणवेश परिधान केलेला, बंदूक धरलेला आणि डोक्यावर पगडी घातलेला दिसत होता.
'बॉर्डर २' कधी प्रदर्शित होणार?'बॉर्डर'मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट जेपी दत्ता, निधी दत्ता आणि टी-सीरीज प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवला जात आहे. 'बॉर्डर २' पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
सनी देओलच्या वर्कफ्रंटबद्दलसनी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा 'जाट' चित्रपटात दिसला होता. आता त्याच्याकडे 'बॉर्डर २', 'लाहोर १९४७' आणि नितेश तिवारीचा 'रामायण' सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.