Join us
Daily Top 2Weekly Top 5

Border 2: बॉक्स ऑफिसवर राज्य करायला येतोय 'बॉर्डर २', ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सिनेमाची १ लाख तिकिटे विकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:08 IST

'बॉर्डर २'चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'बॉर्डर २' पुढे 'धुरंधर' सिनेमाचं मोठं आव्हान आहे.

Border 2: बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजलेला ९०च्या दशकातील 'बॉर्डर' सिनेमाचा सीक्वल 'बॉर्डर २'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दोन दिवसांनी आता 'बॉर्डर २' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'बॉर्डर २'चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'बॉर्डर २' पुढे 'धुरंधर' सिनेमाचं मोठं आव्हान आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'धुरंधर' सिनेमा अजूनगही बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. पण 'बॉर्डर २'देखील या सिनेमाला चांगलीच टक्कर देणार असल्याचं दिसून येत आहे. 

'बॉर्डर २'च्या अॅडव्हान्स बुकिंगला १९ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांत या सिनेमाची तब्बल १ लाख तिकिटे विकली गेली आहेत. एकूण १ लाख ६ हजार ८५५ तिकिटांची आत्तापर्यंत विक्री झाली आहे. 'बॉर्डर २'ने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच दोन दिवसांत ३.४३ कोटींचा गल्ला जमवला आहे. देशभरात हा सिनेमा तब्बल ५ हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे 'बॉर्डर २' च्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ होऊ शकते. पहिल्या दिवशी 'बॉर्डर २' सिनेमा ३५-४० कोटींची कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

'बॉर्डर २' सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राना अशी स्टारकास्ट आहे. अनुराग सिंग यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर येत्या २३ जानेवारीला 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Border 2' set to rule box office; advance booking soars.

Web Summary : The much-awaited 'Border 2' is releasing soon, with advance bookings already selling over 1 lakh tickets and earning ₹3.43 crore. Starring Sunny Deol and Varun Dhawan, the film is expected to release on 5000 screens and compete with the already successful 'Dhurandhar'.
टॅग्स :सीमारेषासनी देओलवरूण धवन