Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोनी म्हणतो, राम गोपाल वर्मा 'विकृ त'!निर्माता-दिग्दर्शक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:23 IST

बोनी म्हणतो, राम गोपाल वर्मा 'विकृ त'!निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा व निर्माता बोनी कपूर यांच्यात वाक:युद्ध सुरू झाले ...

बोनी म्हणतो, राम गोपाल वर्मा 'विकृ त'!निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा व निर्माता बोनी कपूर यांच्यात वाक:युद्ध सुरू झाले आहे. यासाठी राम गोपाल वर्माच्या 'गन अँण्ड थाईज' आत्मकथेतील श्रीदेवीवर लिहलेले 'प्रेमपत्र' हे प्रक रण कारणीभूत ठरले आहे. यात श्रीदेवीचा विषय काढल्याने संतापलेल्या बोनी कपूरने वर्मा विकृत असल्याची टीका केली आहे. यातून श्रीदेवीचा अपमान केल्याचे बोनी म्हणतो. राम गोपाल वर्माने आपल्या आत्मकथेत बोनी कपूरच्या किचनमध्ये चहा बनविणारी अभिनेत्री असा श्रीदेवीचा उल्लेख केला आहे. आत्मकथेत केलेली ही टीका बोनी कपूरला बोचली आहे. त्याने राम गोपाल वर्माला प्रत्युत्तर दिले आहे. रामगोपाल वर्माची मानसिक स्थिती योग्य नाही. तो विकृत झाला आहे.