Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीदेवी यांच्या निधनामुळे बोनी कपूर झाले निशब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:08 IST

श्रीदेवी यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे पती बोनी कपूर हे त्यांच्या सोबतच होते. खरे तर श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी ते शनिवारीच ...

श्रीदेवी यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे पती बोनी कपूर हे त्यांच्या सोबतच होते. खरे तर श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी ते शनिवारीच मुंबईहून दुबईला गेले होते. बोनी दुबईला पोहोचताच थेट श्रीदेवी थांबलेल्या हॉटेलात गेले. त्यांनी श्रीदेवींना उठवले. दोघांनीही पंधरा मिनिटे गप्पा केल्यात. यानंतर डिनरला जायचे म्हणून श्रीदेवी फ्रेश व्हायला बाथरूमध्ये गेल्या. पण १५ मिनिटे होऊनही त्या बाहेर आल्या नाहीत. बोनी यांनी दार ठोठावले. पण आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी श्रीदेवी बाथटबमध्ये  बेशुद्धावस्थेत आढळल्या. बोनी यांनी सर्वप्रथम त्यांना शुद्धीत आणण्यात प्रयत्न केलेत. यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. ते कोणत्याही फिल्मी पार्टीत एकत्रच दिसायचे. आपल्या पत्नीच्या जाण्याने बोनी कपूर यांना प्रचंड धक्का बसला आहे. ते एखाद्या लहान मुलासारखे रडत आहेत. श्रीदेवींच्या निधनाने ते पूर्णपणे खचून गेले आहेत. श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटींची रिघ लागली आहे. बोनी कपूर हे कोणाशी बोलण्याच्या देखील अवस्थेत नाहीयेत. ते श्रीदेवी यांच्या पार्थिवाच्या जवळच बसून आहेत. त्यांचा मुलगा अर्जुन त्यांच्या मागे उभा राहून त्यांना आधार देत आहेत. बोनी यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुली जान्हवी आणि खुशी देखील खचून गेल्या आहेत. सोनम कपूर, अर्जुन कपूर, अनिल कपूर, अनिलची पत्नी सुनिता हे कपूर कुटुंबातील सदस्य बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींना सांभाळत आहेत. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.  Also Read : ​वधूप्रमाणे सजवले गेले आहे श्रीदेवी यांचे पार्थिव