Join us

श्रीदेवींचा ‘तो’ व्हिडिओ आपलाच म्हणणाऱ्या चाहतीला बोनी कपूर यांनी दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 21:13 IST

आयफा2018 सोहळ्यात दाखवला गेलेला श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओ माझा होता आणि आयफाने तो चोरला, असा आरोप करणा-या चाहतीला श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी उत्तर दिले आहे. 

आयफा2018 सोहळ्यात दाखवला गेलेला श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओ माझा होता आणि आयफाने तो चोरला, असा आरोप करणा-या चाहतीला श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी उत्तर दिले आहे. यंदा जूनच्या अखेरीस आयफा सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा सोहळा टीव्हीवर टेलिकास्ट करण्यात आला. या रंगारंग सोहळ्यात श्रीदेवी यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली गेली होती़ काही मिनिटांच्या या व्हिडिओत श्रीदेवींच्या फिल्मी करिअरची झलक आणि त्यांच्या काही आठवणी दाखवण्यात आल्या होत्या. या व्हिडिओने सगळ्यांनाच भावूक केले होते. आयफाने दाखवलेला श्रीदेवींचा हा व्हिडिओ आपला असून आयफाने तो चोरला, असा दावा सबा आरीफ या श्रीदेवींच्या चाहतीने केला होता.‘ हे वेदनादायी आहे. तुमच्या कामाला, कष्टाला दुसरेचं कुणी आपले नाव देते, तेव्हा आपण ठगवलो गेल्याचे जाणवते. काल रात्री मी टीव्हीसमोर बसले. समोर आयफा सोहळ्याचे प्रसारण सुरू होते. टीव्हीवरचा हा सोहळा पाहताना मला अचानक धक्का बसला. कारण मी बनवलेला एक अख्खा व्हिडिओ माझ्या परवानगीविना यात दाखवला गेला होता. इंडस्ट्रीतील अनेक लोक हा व्हिडिओ पाहून रडू लागलेत. या व्हिडिओचे क्रेडिट मला दिले गेले असते तर ती माझ्या करिअरमधील सर्वात मोठी उपलब्धी ठरली असती. माझा व्हिडिओ चोरल्याबद्दल धन्यवाद,’ अशा शब्दांत तिने आपली याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती.

 आता बोनी कपूर यांनी सबाच्या आरोपाला उत्तर दिले आहे. ‘व्हिडिओतील जवळपास सगळे क्लिप्स माझ्या वा यशराज फिल्म्सचे आहेत. त्यामुळे याचा कसा आणि कुठे वापर करायचा, याचा अधिकार आम्हाला आहे. यशराजसोबत चर्चा करून मी या व्हिडिओला परवानगी दिली होती. सबा आरिफ या व्हिडिओला आपला कशी म्हणू शकते, ते मला जाणून घ्यायचे आहे. या व्हिडिओबद्दल त्यांना कुठलीही समस्या असेल तर असे जाहिर आरोप करण्याऐवजी त्यांनी मला भेटायला हवे,’ असे बोनी कपूर यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे, बोनी कपूर यांच्या या खुलाशावर सबा आरिफनेही प्रतित्त्युर दिले आहे. ‘व्हिडिओतील सगळ्या क्लिप्स तुमच्या आहेत, यात वादचं नाही. पण त्याची कल्पक मांडणी करण्यात मी तीन दिवस घालवले होते. आयफाने मी बनवलेल्या व्हिडिओतील एकही क्रम बदलला नाही. मी क्लिपच्या वापराबद्दल बोलले नव्हतेच. मी केवळ माझ्या श्रेयाबद्दल बोलले होते. हा व्हिडिओ माझाचं आहे, असेच मी आजही म्हणेल. माझ्या पोस्टवर हा खुलासा बघून मी अचंबित आहे,’ असे सबाने म्हटलेय.

 

टॅग्स :बोनी कपूर