Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची ‘चांदनी’च्या जीवनावर लवकरच सिनेमा?,बोनी कपूर सिनेमा बनवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 11:04 IST

हिंदी चित्रपटसृष्टीची ‘चांदनी’च्या आकस्मिक जुदाईने सा-यांनाच सदमा लागला आहे.अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कुणालाच होत  नाही. ...

हिंदी चित्रपटसृष्टीची ‘चांदनी’च्या आकस्मिक जुदाईने सा-यांनाच सदमा लागला आहे.अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कुणालाच होत  नाही. रसिक असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकालाच ‘हवाहवाई’ श्रीदेवी यांच्या जाण्याने धक्का बसला आहे.हा क्षण तमाम कपूर कुटुंबीयांसाठी जणू काही परीक्षेचा काळच आहे.श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या अखेरच्या क्षणी तिथेच होते.त्यामुळे बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या निधनामुळे फार मोठा धक्का बसला असून ते पूर्णपणे खचले आहेत.आपले सिनेमा आणि आपल्या भूमिका यामुळे कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या श्रीदेवी मृत्यू पश्चातही तितक्याच चर्चेत आहेत.रुपेरी पडद्यावर लवकरच श्रीदेवी यांच्या जीवनावर सिनेमा साकारणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. खुद्द श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर हेच हा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये रंगते आहे.या सिनेमाच्या नावावरही शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. मात्र या सगळ्या निव्वळ अफवा असण्याची शक्यता आहे.कारण याबाबत खुद्द बोनी कपूर किंवा कपूर कुटुंबीयांपैकी एकानेही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. शिवाय श्रीदेवी यांच्या जीवनावर कुणाला सिनेमा बनवायचा असेल तर त्यांना कपूर कुटुंबीय किंवा बोनी कपूर यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.सध्या तरी कपूर कुटुंबीयांचं सर्व लक्ष श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड एंट्रीकडे लागल्या आहेत.'सैराट'चा रिमेक असणा-या 'धडक' या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवणार आहे.तिच्या या पदार्पणासाठी श्रीदेवीसुद्धा उत्सुक होत्या.त्यामुळे जान्हवीचा पहिला सिनेमा याकडे कपूर कुटुंबीयांच्या नजरा लागल्या आहेत.(Also Read:श्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग्लॅमरस फोटोशूट,पाहा फोटो!)श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर अलीकडे संजय लीला भन्साळींच्या आॅफिसबाहेर दिसली होती.यानंतर जान्हवी भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार,या चर्चेला जोर चढला होता.भन्साळी एक ऐतिहासिक चित्रपट बनवत असून यात त्यांना जान्हवी हवी आहे,अशीही चर्चा होती.करिअरच्या अगदी सुरुवातीला भन्साळींचा चित्रपट आॅफर व्हावा  म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा जान्हवीवर टिकल्या होत्या. तिच्या चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. पण आता या चर्चेला नवे वळण देणारी बातमी आहे.होय,जान्हवी भन्साळींच्या आॅफिसबाहेर दिसली, हे खरे असले तरी ती तिथे का गेली, यामागे मात्र एक वेगळीच स्टोरी आहे.होय, जान्हवी आपल्या लहान बहीणीसोबत भन्साळींचे आॅफिस असलेल्या बिल्डिंगमध्ये गेली होती. पण भन्साळींना भेटण्यासाठी नव्हे तर भन्साळींची भाची शर्मिन सेहगल हिला भेटण्यासाठी.