Join us

हॉलिवूडच्या ‘या’ ७ चित्रपटांनी केली बॉलिवूडची कॉपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

आपण अनेकदा म्हणतो की, बॉलिवूडचा अमका तमका चित्रपट या हॉलिवूड चित्रपटावरून कॉपी केला आहे. हॉलिवूडच्या त्या चित्रपटाची मांडणी, प्लॉट, कथानक हे बॉलिवूडमधील त्याच चित्रपटाच्या कित्येक पटीने सरस असते. पण, तुम्हाला हे माहितीये का की, हॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांची कॉपी केली आहे. पाहूयात, कोणते आहेत हे चित्रपट!

आपण अनेकदा म्हणतो की, बॉलिवूडचा अमका तमका चित्रपट या हॉलिवूड चित्रपटावरून कॉपी केला आहे. हॉलिवूडच्या त्या चित्रपटाची मांडणी, प्लॉट, कथानक हे बॉलिवूडमधील त्याच चित्रपटाच्या कित्येक पटीने सरस असते. पण, तुम्हाला हे माहितीये का की, हॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांची कॉपी केली आहे. पाहूयात, कोणते आहेत हे चित्रपट! अ कॉमन मॅन (२०१३) - हॉलिवूडचा स्टार बेन किंग्जस्ले याच्या मुख्य भूमिकेतील ‘अ कॉमन मॅन’ हा चित्रपट नीरज पांडे यांच्या २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘अ वेनसडे’ या चित्रपटावर आधारित आहे.पर्ल हार्बर (२००१) - राज कपूर यांचा १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संगम’ चित्रपटावरून ‘पर्ल हार्बर’ हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही या चित्रपटाला ‘मॉडर्न संगम’ असेही म्हणू शकता.फिअर (१९९६) - १९९३ मध्ये सनी देओल, शाहरूख खान आणि जुही चावला यांचा ‘डर’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटाची कॉपी म्हणजे ‘फिअर’ हा सिनेमा आहे.विन अ डेट विथ टॅड हॅमिल्टन (२००४) - आमिर खान याचा १९९५ मध्ये ‘रंगीला’ हा चित्रपट रिलीज झाला होता. मित्र आणि फिल्मस्टार यांपैकी आपण कुणाच्या प्रेमात आहोत याच्या संभ्रमात पडलेल्या मुलीची ही कथा आहे. ‘विन अ डेट विथ टॅड हॅमिल्टन’ हा चित्रपट रंगीलाची कॉपी आहे.किल बिल (२००३) - २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अभय’ या चित्रपटावरून प्रेरित होऊन किल बिल या हॉलिवूडपटाची निर्मिती झाली.लीप ईअर (२०१०) - इम्तियाज अली यांचा २००७ मध्ये ‘जब वी मेट’ हा चित्रपट रिलीज झाला होता. शाहिद कपूर आणि करिना कपूर खान यांच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटावरून ‘लीप ईअर’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे.डिलीव्हरी मॅन (२०१३) - आयुषमान खुरानाच्या मुख्य भूमिकेतील ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या कथानकासारखे कथानक असलेला चित्रपट म्हणजे डिलीव्हरी मॅन. काही लोक असं म्हणतात की, हा चित्रपट ‘फ्रेंच-कॅनॅडिअन’ चित्रपट ‘स्टारबक’ चा रिमेक आहे.