Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचा हा लोकप्रिय अभिनेता आजही आहे करिष्मा कपूरसाठी अविवाहित, केलं जीवापाड प्रेम पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 21:00 IST

सिनेमात त्याने साकारेल्या भूमिकांना रसिकांकडून म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे वडील विनोद खन्ना यांच्या इतकं यश अक्षयच्या वाट्याला आलेलं नाही.

हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि हँडसम अभिनेते असा लौकिक मिळवणारे अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. आपल्या अभिनयाने विनोद खन्ना यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलं पुढं चालवतायत. विनोद खन्ना यांचा लेक अक्षय खन्ना यानेही हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. ‘बॉर्डर’, ‘दिल चाहता है’, ‘डोली सजा के रखना’, ‘ताल’, ‘गांधी माई फादर’, ‘हमराज़’, ‘दिवानगी’, ‘गली-गली चोर है’, ‘आ अब लौट चलें’ आणि ‘हलचल अशा चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मात्र अक्षयच्या या भूमिकांना रसिकांकडून म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे वडील विनोद खन्ना यांच्या इतकं यश अक्षयच्या वाट्याला आलेलं नाही.

 

 

'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं. ही अभिनेत्री म्हणजे करिष्म्मा कपूर. करिष्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्यानं ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिष्मा पसंत होती. ते करिष्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिष्माच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. करिष्माचे वडील रणधीर यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांची पत्नी बबिताला हे मान्य नव्हतं. त्यांना करिष्मा आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न व्हावं असं वाटत होतं. मात्र करिष्माला अभिषेक पसंत नव्हता.

अक्षय आणि अभिषेक या दोघांनाही सोडून तिने बिझनेसमन संजय कपूरचा हात धरला. मात्र दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. दोघं काडीमोड घेऊन वेगळे झालेत. मात्र तिकडे अक्षयचे आजही जीवापाड प्रेम आहे. तरीही काही लग्नाच्या विचारात नाही असं करिष्माने अक्षयला सांगितल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे फिल्मी प्रेमकहाणी वाटावी अशी अक्षयची रिअल प्रेमाची कहाणी आहे. अजूनही खऱ्या प्रेमाची त्याला प्रतीक्षा आहे.

टॅग्स :अक्षय खन्नातब्बू