Join us

अर्जुन-परिणितीवर चित्रित केले बॉलिवूडमधील सर्वांत महागडे गीत; बजेट जाणून धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 21:20 IST

अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा सध्या त्यांच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सूत्रानुसार, हा एक ...

अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा सध्या त्यांच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सूत्रानुसार, हा एक म्युझिकल रोमॅण्टिक चित्रपट आहे. याचदरम्यान एक बातमी समोर येत आहे की, या चित्रपटातील एक गाणे नुकतेच शूट करण्यात आले. आता तुम्ही म्हणाल की, यात नवीन काय? तर या दोघांवर जे गाणे शूट करण्यात आले ते सर्वांत महागडे गाणे ठरले आहे. निर्माता विपुल शाह यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या करिअरमधील सर्वांत महागडे गाणे मी शूट केले आहे. त्याच्या मते, ‘नमस्ते इंग्लंड’मधील ‘तू मेरी मैं तेरा’ या गाण्याच्या शूटिंगसाठी ५.५ कोटी इतका खर्च आला आहे. हे गाणे तब्बल ११ दिवसांत शूट केले आहे. विपुल शाहने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘सर्वसामान्यपणे मी आकड्यांवर कधीच बोलत नाही. परंतु मी जे गाणे शूट केले आहे ते माझ्या करिअरमधील सर्वांत महागडे आहे. या ट्रेवल सॉन्गला जावेद साहब यांनी डायरेक्ट केले असून, त्याच्यापेक्षा दुसरे कोणीच ते करू शकले नसते, असे मी मानतो. विपुल शाह यांनी सांगितले की, हे गाणे १८ ते २० लोकेशनवर शूट करण्यात आले. परिणिती आणि अर्जुनचे पात्र पंजाब ते लंडनचा प्रवास करताना गाण्यात दिसणार आहे. याचदरम्यान हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचा काही भाग समुद्रामध्येही चित्रित करण्यात आला आहे. दरम्यान, या अगोदरही बॉलिवूडमध्ये महागड्या गाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये, ‘पार्टी आॅल नाइट, मलंग, ठा-ठा करके आणि डोला रे डोला’ यांचा समावेश आहे. आता या यादीत ‘में तू मेरी, मै तेरा’ या गाण्याचाही समावेश झाला आहे.