बॉलिवूडची हसीना श्रद्धा कपूरसह निर्मात्यावर गुन्हा दाखल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:25 IST
लवकरच श्रद्धा कपूर मोठ्या पडद्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणी हसीना पारकरची भूमिका साकारणार आहे. सध्या श्रद्धा कपूर या ...
बॉलिवूडची हसीना श्रद्धा कपूरसह निर्मात्यावर गुन्हा दाखल !
लवकरच श्रद्धा कपूर मोठ्या पडद्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणी हसीना पारकरची भूमिका साकारणार आहे. सध्या श्रद्धा कपूर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. पण या चित्रपटामागचे शुलकाष्ट काही केल्या संपायचे नाव घेत नाही आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात गुंतत चालला आहे. एका कपड्या कंपनीने श्रद्धा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 22 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी चित्रपटातच्या प्रमोशन दरम्यान श्रद्धा परिधान केलेल्या कपड्यांवर या कंपनीच्या ब्रँडचा लेबल लावण्यात येणार असल्याचा करार झाला होता. ज्यामुळे या ब्रँडचे सुद्धा प्रमोशन होऊ शकले. मात्र श्रद्धाने असे केले नाही. त्यामुळे कंपनीने हसीनाच्या निर्माते आणि श्रद्धाने झालेला करार मोडल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. अपूर्व लखियाने दिग्दर्शित या चित्रपटाची दोन वेळा हसीना पारकरची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. यात हसीनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारत आहेत तर तिच्या भावाची भूमिका म्हणजेच दाऊदची व्यक्तिरेखा श्रद्धाचा खरा भाऊ सिद्धार्थ साकारतो आहे. तर हसीनचा नवरा इब्राहिम पारकरच्या भूमिकेत अंकुर भाटिया दिसणार आहे. हा चित्रपट आधी 18 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार होता. मात्र त्यादिवशी आयुषमान खुराणा आणि क्रिती सॅननचा बरेली की बर्फी चित्रपट रिलीज होणार होता त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील क्लॉशेस टाळण्यासाठी हसीनाची रिलीज टेड पुढे सरकवण्यात आली होती.ALSO READ : फुलराणी सायना नेहवालच्या घरी पोहोचली श्रद्धा कपूर, पहा फोटो !हसीनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने 4 कोटींचे मानधन घेतल्याचे कळते आहे. हसीनाला 'आपा' या नावाने ओळखले जायचे. दाऊद देश सोडून पळून गेल्यावर तिनेच त्याचा बेकायदेशीर कारभार सांभाळला होता. ही भूमिका करणे श्रद्धसाठी एका चॅलेंजचं होते. पण तिने हे चॅलेंज स्वीकारले. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यानंतर श्रद्धा प्रभासच्या साहोमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती हैदराबादला रवाना झाली आहे तिकडे चित्रपटाची शूटिंगसुद्धा सुरु करण्यात आली आहे.