Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचा ‘हा’ फ्लॉप अभिनेता जगतो आलिशान जीवन; त्याची कमाई जाणून तुम्ही दंग व्हाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 15:29 IST

बरेचसे बॉलिवूड कलाकार असे आहेत, ज्यांनी अभिनयात फारसे यश न मिळाल्याने राजकारणात करिअर केले. परंतु एक कलाकार असा आहे, ...

बरेचसे बॉलिवूड कलाकार असे आहेत, ज्यांनी अभिनयात फारसे यश न मिळाल्याने राजकारणात करिअर केले. परंतु एक कलाकार असा आहे, ज्यांनी अभिनयाला गुडबाय केल्यानंतर दुसºयाच क्षेत्रात यश मिळविले. वास्तविक जेव्हा हा अभिनेता बॉलिवूडमध्ये आला तेव्हा त्याने बॅक टू बॅक दोन हिट चित्रपट दिले. मात्र अशातही त्याला बॉलिवूडमध्ये फारसे काम मिळाले नाही. अखेर त्याने बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात आपले करिअर केले. या क्षेत्रात त्याने एवढे यश मिळविले की, आज तो केवळ पैशांमध्येच खेळत नाही तर लोकप्रियतेतही तो अव्वलस्थानी आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकल्यास त्याच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. हा बॉलिवूड अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून, अभिनेता साहिल खान आहे. शरमन जोशीबरोबर ‘स्टाइल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने तुफान धमाल केली. याव्यतिरिक्त अभिनेता जॅकी श्रॉफ याची पत्नी आयशा श्रॉफसोबत त्याने एक प्रोडक्शन हाउसही सुरू केले. ज्याचे नाव कर्मा प्रोडक्शन्स असे आहे. मात्र आयशासोबतची त्याची जोडी फार काळ टीकली नाही. कारण तिने त्याच्यावर तब्बल सहा कोटी रूपयांची हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. तसेच तो गे असल्याचा आरोपही तिने केला होता.  आयशाच्या या आरोपाला उत्तर देताना साहिल खाननेही तिचे काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यावेळी साहिलने हा आरोप लावला होता की, जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली आहे. ती बळजबरीने माझ्याशी जवळिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असे. मला महागडे गिफ्ट्स देत असे. असो, सध्या साहिल बॉडी बिल्डिंगच्या जगतात नाव कमावत आहे. त्याने मसल्स अ‍ॅण्ड बीच नावाने एक जीम चेन सुरू केली आहे. याची पहिली ब्रांच गोव्याच्या बागा बीचवर सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहिलची एक वेबसाइट असून, त्यामाध्यमातून आॅनलाइन ट्रेनिंग देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर बरेचसे कोर्सही तो शिकवितो. ज्यामधून तो त्याच्या क्लाइंट्सला आहार, वर्कआउटसंबंधी सल्ले देत असतो. त्याचबरोबर त्याने एक यू-ट्यूब चॅनेलही सुरू केले असून, त्यावर तो लाइव्ह वर्कआउट करण्याचे धडे देतो. biographynetworth.com या वेबसाइटनुसार साहिल वर्षाकाठी ९ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास ५८ कोटी रूपये कमावितो. साहिल खान आठवड्यातून कमीत कमी चार दिवस वर्कआउट करतो. त्याच्या डायटमध्ये ४० टक्के कार्बोहायड्रेट, ४० टक्के प्रोटीन आणि २० टक्के फॅट असतो. साहिल त्याची गर्लफ्रेंड लव रोज हिच्यासोबतचे फॉरेन ट्रिपचे फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करीत असतो.