Join us

​बॉलिवूडला आहे ‘पंजाबी कुडीं’ची प्रतीक्षा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 16:20 IST

बॉलिवूड ही सगळ्यात मोठी एंटरटेंमेंट इंडस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीला कुणाचेही वावडे नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टी असो वा पंजाबी येथील ...

बॉलिवूड ही सगळ्यात मोठी एंटरटेंमेंट इंडस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीला कुणाचेही वावडे नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टी असो वा पंजाबी येथील टॅलेंटला बॉलिवूडने कायम संधी दिली आहे. मग ते बादशाहचे गाणे असो वा हनी सिंहचे रॅप. अशात पंजाबी इंडस्ट्रीतील नट्याही बॉलिवूडमध्ये आपले नाणे चालवू शकतात. खरे तर बॉलिवूडने साऊथच्या अनेक अभिनेत्रींना संधी दिली आहे. यातुलनेत पंजाबी अभिनेत्री कमी आहेत. पण पंजाबी इंडस्ट्री ही देखील सौंदर्याची खाण आहे. येथे सुद्धा अनेक सुंदर व गुणवान अभिनेत्री आहेत. अशाच काही पंजाबी अभिनेत्रींबाबत आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आल्या तर बॉलिवूडप्रेमींसाठी ती मोठी ट्रिट असेल, हे नक्की...नीरू बाजवानीरू बाजवा ही पंजाबी इंडस्ट्रीतील गुणवान अभिनेत्री. ‘हम’ आणि ‘स्पेशल २६’ मध्ये तिने नशीब आजमावले आहे. अर्थात हे दोन्ही चित्रपट चालले नाहीत. यातील नीरूची भूमिकाही फार आकर्षक नव्हती. नीरू पंजाबी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. बॉलिवूडमध्ये एक मोठा ब्रेक मिळाला तर नीरूचे नशीब पालटायला वेळ लागणार नाही.मैंडी टखरमैंडी ही पंजाबी इंडस्ट्रीत आर्टिस्टिक अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. तिने अनेक पंजाबी चित्रपटात मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या स्ट्राँग इमेजमुळे तिची एक खास ओळख आहे. मैंडीने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेले नाही. तिला ही संधी लवकर मिळो, हीच आशा करूयात.मोनिका गिलमोनिका गिल ही मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकलेली एक सुंदर अभिनेत्री आहे. सौंदर्यासोबत तिचा अभिनयही दमदार आहे. अलीकडे ती ‘सरदारजी2’ या चित्रपटात दिसली होती.सोनम बाजवाअभिनेत्री सोनम बाजवा लवकरच दिलजीत दोसांजच्या अपोझिट दिसणार आहे. ‘पंजाब 1984’मधील तिच्या दमदार अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली. यानंतर सोनम आज पंजाबी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे.श्रुती सोढीपंजाबी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीचे नाव म्हणजे श्रुती सोढी. पंजाबी इंडस्ट्रीतील बबली अशी तिची ओळख आहे. तिचे अनेक चित्रपट हिट झालेत. बॉलिवूडमध्ये तिला पाहायला मिळणे निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे.सिमरन कौरमिस इंडिया आणि मॉडल सिमरन कौर अतिशय सुंदर अभिनेत्रींपैकी एक़ कपिल शर्माच्या ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात ती दिसली होती. यानंतर बॉलिवूडमध्ये ती दिसली नाही. पण तिला एका मोठ्या ब्रेकची प्रतीक्षा नक्कीच आहे.गिन्नी कपूरगिन्नी कपूर पंजाबी इंडस्ट्रीतील एक हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पंजाबी चित्रपटांसोबत अनेक पंजाबी अल्बममध्येही ती दिसली. तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. तिचे असंख्य चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहू इच्छितात, हे इथे सांगायलाच हवे.जपजी खैराजपजीने एकापाठोपाठ एक असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सुंदर तेवढीच प्रतिभावान अशी जपजीची ओळख आहे. जपजीलाही बॉलिवूडच्या संधीची प्रतीक्षा आहे. ओशिन साईओशिन साई ही पंजाबी इंडस्ट्रीतील यंग टॅलेंट आहे. तिला आपल्या पहिल्याच चित्रपटात दिलजीतसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडने कायम यंग टॅलेंटला संधी दिली आहे. अशावेळी ओशिनचा दावा तर बनतोच.