Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीला आहेत 34 मुली, आनंदाने करतेय त्यांचा सांभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 19:11 IST

या अभिनेत्रीने एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तिचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत.

ठळक मुद्देव्यवसाय, अभिनय क्षेत्रात काम करणारी प्रिती झिंटा सामाजिक कार्यही करत असते.

गालावर सुंदरशी खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. प्रिती बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. लहानपणीच प्रितीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर प्रितीला अनेक संघषार्चा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.

व्यवसाय, अभिनय क्षेत्रात काम करणारी प्रिती झिंटा सामाजिक कार्यही करत असते. तिच्या वयाच्या 34 व्या वर्षी 34 मुलींना दत्तक घेतले होते. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिने घेतली आहे. ती वर्षातून दोनदा तरी त्यांना भेटायला जाते. 

शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू ठरला. पण पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. चित्रपटात ती केवळ २० मिनिटे दिसली. पण या २० मिनिटांत प्रितीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली. यातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिले. तिच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

टॅग्स :प्रीती झिंटा