Join us

​ग्लोबल सिटीझन फेस्टीव्हलमध्ये दिसणार बॉलिवूड स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:52 IST

सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली जागतिक संघटना ग्लोबल सिटीझनसाठी बॉलिवूड स्टार आमिर खान, शाहरुख खान व महान क्रिकेटपटू सचिन तेंदुलकर ...

सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली जागतिक संघटना ग्लोबल सिटीझनसाठी बॉलिवूड स्टार आमिर खान, शाहरुख खान व महान क्रिकेटपटू सचिन तेंदुलकर एकत्र येणार आहेत. ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलला शाहरुख व सचिन यांनी आपला पाठिंबा दर्शविला असून विविध क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल आयोजित केला जाणार असून हा कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाला आंतराराष्ट्रीय कलावंतांसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात जगविख्यात बँड कोल्डप्ले, जे जेड, बॉलिवूड स्टार आमिर खान, ए. आर. रहमान, फरहान अख्तर, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, कॅटरीना कैफ, श्रद्धा कपूर, शंकर-एहसान-लॉए, अरिजीत सिंग, आयुष्यमान खुराना, अर्जून कपूर, मलायका अरोरा, परिणीति चोप्रा, आॅलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक, बॉक्सर विजेंदर सिंग आणि मोनाली ठाकुर सहभागी होणार आहेत. }}}} ">http://भारतात ग्लोबल सिटीझन इंडिया या नावाने ही संस्था काम करणार असून यात शिक्षण, लैंगिक समानता व स्वच्छता या विषयी जनजागृती करणार आहे. ग्लोबल सिटीझन फेस्टीव्हलमध्ये गीत, संगीतासह नृत्याविष्कार व शार्ट फिल्मस दाखवण्यात येतील. हा कार्यक्रम सहा तास चालणार असल्याचे कळते.