Join us

अमिषा पटेलच्या सेल्फींमुळे त्रस्त झाले बॉलीवूडकर; वाचा काय आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 17:17 IST

अमिषाने सेल्फींसाठी सर्वांना हैराण करून सोडले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक सेलिब्रेटींनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यास नकार दिला. तिच्या अशा वागण्यामुळे अनेक जण तिला पाहताच दुर्लक्ष करण्यासाठी दूर पळतात.

अमिषा पटेल एकेकाळी बॉक्स आॅफिस क्वीन (थोड्या दिवसांकरिता का होईना!) म्हणून ओळखली जाईची. ‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरडुपर ब्लॉकबस्टर चित्रपटातून हृतिक रोशनसोबत पदार्पण केल्यानंतर ‘गदर’सारखा बॉक्स आॅफिसवर अनेक विक्रम रचलेला चित्रपट देऊनही तिचे करिअर म्हणावे तसे निर्माण झाले नाही.म्हणून सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या अमिषाला प्रसिद्धीपासून मात्र दूर राहणे जमत नसल्याचे दिसतेय. चंदेरी पडद्यापेक्षा सोशल मीडियावरच अधिक दिसणाऱ्या अमिषाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक नजर फिरवली तर लगेच कळते की, तिला बॉलीवूड स्टार्ससोबत सेल्फी काढण्याची किती हौस आहे.काही दिवसांपूर्वी रणधीर कपूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीत अमिषाही गेली होती. तेथे उपस्थित सर्व सेलिबे्रटींसोबत सेल्फी काढण्यासाठी तिची सुरू असलेली धडपड सर्वांच्याच चर्चेचा विषय होता. रणबीर कपूरसोबत एक फोटो घेण्यासाठी ती सुमारे १५ मिनिटे वाट पाहत बसली होती. अखेर रणबीरने कंटाळून तिच्यासोबत एक फोटा काढला.        त्यानंतर तिने अमिताभ बच्चन, रेखा, राकेश रोशन, करिना कपूर यांच्यासोबत फोटो घेतले. नुकतेच पार पडलेल्या ‘रंगून’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगलादेखील ती हजर होती. तेथेसुद्धा सेल्फी काढण्यासाठी तिचा सुरू असलेला आटापिटा पाहून शाहिद कपूर, कंगना राणौतही वैतागले. पण तिने प्रयत्न सोडले नाही.   नील नितीन मुकेशच्या लग्नातही अमिषाने सेल्फींसाठी सर्वांना हैराण करून सोडले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक सेलिब्रेटींनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यास नकार दिला. तिच्या अशा वागण्यामुळे अनेक जण तिला पाहताच दुर्लक्ष करण्यासाठी दूर पळतात. मध्यंतरी उर्वशी रौतेलासुद्धा अशा ‘सेल्फी वेडा’पायी चर्चेत आली होती. मनीष मल्होत्राच्या पार्टीत तर ती स्टार्सच्या मागे सेल्फीसाठी बाथरूमपर्यंत गेली होती. अमिषा आमचे तुला एवढेच सांगणे आहे की, तु स्टार्ससोबत सेल्फीकाढून तुझ्या करिअरला काही गती मिळणार नाहीए. त्यासाठी चांगल्या चित्रपटांत चांगले काम करावे लागेल, उत्तम अभियानाची चुणूक दाखवावी लागेल. सोशल मीडियावर असे सेल्फी काढून प्रसिद्धी मिळवून काही फायदा नाही.ALSO READ: ​अर्जुन रामपालसोबलत सेल्फीसाठी उर्वशी गेली बाथरुमपर्यंत?