Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध गायक अरमान मलिकची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट, म्हणाला-"गेले काही दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 09:49 IST

प्रसिद्ध गायक अरमान मलिक रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत 

Bollywood Singer Armaan Malik: 'प्रिन्स ऑफ रोमान्स' नावाने ओळखला गायक, संगीतकार,अरमान मलिक हा तरुणाईतील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. अरिजीत सिंग पाठोपाठ अरमान मलिकचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच   अरमान मलिकची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरमान मलिकबद्दल ही माहिती समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत.

नुकताच अरमान मलिकने त्याचा रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत गायकाने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. मात्र, त्याने रुग्णालयात दाखल होण्याचे कारण स्पष्ट केलं नाही. दरम्यान, या पोस्टमध्ये अरमानने म्हटलंय  की, गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती आणि याच कारणामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.त्याने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'गेले काही दिवस चांगले गेले नाहीत.'त्याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. अरमानने त्याच्या एक्स अकाउंटवर हाताला सलाईन लावलेला एक फोटो पोस्ट केला होता. मात्र, आता आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीही त्याने चाहत्यांना दिली आहे.

दरम्यान, अरमान मलिकने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत त्याच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट् करत म्हटलंय, लवकर बरा हो... तर आणखी एका यूजरने त्याला विचारलंय, तू हॉस्पिटलमध्ये अॅडमिट का झालास... तुला नक्की काय झालं. असं म्हणत चाहते त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. तसंच तो लवकरच बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना देखील करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Singer Armaan Malik Ill, Hospitalized: Shares Health Update with Fans

Web Summary : Singer Armaan Malik, known as the 'Prince of Romance,' was hospitalized due to ill health. He shared a photo from the hospital, informing fans he hadn't been feeling well but is now recovering. Fans expressed concern and wished him a speedy recovery.
टॅग्स :अरमान मलिकबॉलिवूडसेलिब्रिटी