Join us

सलमान खानला मागे टाकता शाहरुख खान बनला पुन्हा किंग, फॅन्सनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:10 IST

शाहरुखच्या नावाचा हॅश टॅगसुद्धा ट्रेंड होतोय.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या नव्या प्रोजेक्टच्या वाट त्याचे फॅन्स मोठ्या आतुरतेने करतायेत. सिनेमा जरी शाहरुखनचा वावर कमी दिसत असला तरी सोशल मीडियावर किंग खान खूपच अॅक्टिव्ह आहे. ट्विटरवर शाहरुख खानचे 40 कोटी (मिलियन) फॉलोवर्स झाले आहेत. शाहरुखच्या फॅन्सनी त्याचे अभिनंदन केले आहे. सध्या ट्विटरवर  #SRK40Million हा हॅश टॅग ट्रेंड होतोय. सध्या शाहरुखचे फॅन्स त्याच्यावर शुभेच्छांना वर्षाव करतायेत. 

सध्या शाहरुख खान कुटुंबीयांसोबत कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाईन झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फॅन्समध्ये कोरोना व्हायरसबाबत जागरुकता निर्माण करतोय. 

शाहरुख शेवटचा अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत झिरो सिनेमात दिसला होता. आता शाहरुख अभिनेता नव्हे तर एक निर्माता म्हणून आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पुल्कीत सांभाळणार असून त्याने सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित अ्सलेल्या एका चित्रपटाचे नुकतेच दिग्दर्शन केले होते. मुझ्झफरपूर बिहारमधील या केसचा चित्रपटाच्या टीमने प्रचंड अभ्यास केला असून त्यांची पटकथा देखील लिहून झाली आहे. एका पत्रकाराच्या नजरेतून या चित्रपटाची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जुलैला सुरू होणार असून या चित्रपटात कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार यावर सध्या टीम काम करत आहे.

 

टॅग्स :शाहरुख खान