Raid 2 Box Office Collection Day 7: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'रेड-२' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 'सिकंदर', 'जाट', 'केसरी-२' आणि 'फुले', 'ग्राउंड झिरो' या चित्रपटांच्या तुलनेत 'रेड-२' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. १ मे या दिवशी प्रदर्शित झालेल हा चित्रपटाचे कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अवघ्या ४८ कोटींच्या बजेट असलेल्या 'रेड-२' चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राज कुमार दिग्दर्शित 'रेड-२' हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड चित्रपटाचा सीक्वल आहे. त्यानंतर 'रेड' सीक्वलची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अलिकडेच 'रेड २' चित्रपट प्रदर्शित झाल्याने सिनरसिकांना त्याला अक्षरश डोक्यावर घेतलं आहे. पहिल्या भागाप्रमाणेच 'रेड'चा सीक्वलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पहिल्या दिवसापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करायला सुरुवात केली आहे. त्यात आता या सिनेमाच्या सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'रेड-२' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या दिवसात चित्रपटाने ग्रॅंड ओपनिंग करत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला. प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी ४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत या चित्रपटाने ९०.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. परंतु, ही प्रारंभिक आकडेवारी आहे यात थोडाफार बदल होऊ शकतो. यासह, अजय देवगणचा हा चित्रपट छावा, स्काय फोर्स आणि सिकंदर या चित्रपटानंतर वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट बनला आहे.
दरम्यान, 'रेड २' या सिनेमात रितेश देशमुख, अजय देवगण, वाणी कपूर, सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात अजय देवगण अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे.